**बार्शी : रेल्वे फाटक क्र. १० आज सकाळी ८ पासून उद्या रात्री ८ पर्यंत पूर्णपणे बंद; वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा**
**बार्शी : रेल्वे फाटक क्र. १० आज सकाळी ८ पासून उद्या रात्री ८ पर्यंत पूर्णपणे बंद; वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, १९ नोव्हेंबर : मध्य रेल्वेच्या सोलापूर-लातूर मार्गावरील बार्शी टाऊनजवळील महत्त्वाचा समपार फाटक क्रमांक १० (एलसी नं. १०, किलोमीटर ४०८/४-५) आज बुधवारी सकाळी ८.०० वाजल्यापासून ते उद्या गुरुवारी २० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ८.०० वाजेपर्यंत सलग ३६ तास ट्रॅक दुरुस्ती व देखभाल कामासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत बार्शी_कासरवाडी रोडवरून ये-जा करणारी सर्व प्रकारची वाहने थांबवली जातील.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे काम अत्यंत आवश्यक असून ट्रॅकची सुरक्षितता आणि गाड्यांची गती टिकवण्यासाठी ते तातडीने करावे लागत आहे. या फाटकामुळे बार्शी शहर आणि कामारवाडी, सौंदरे, शेंद्री परिसर जोडला जातो. फाटक बंद असताना वाहनधारकांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेचे सेक्शन इंजिनिअर (र.प.) वाग्मी टाऊन यांनी केले आहे.
पर्यायी मार्ग :
- बार्शी ते कासरवाडी/सौंदरे : कासारवाडी-सौंदरे-बार्शी हा पर्यायी रस्ता वापरावा.
- उलट दिशेनेही हाच मार्ग वापरावा लागेल.
या बंदामुळे सकाळी आणि संध्याकाळी शाळा-कॉलेज, बाजारपेठ आणि कामानिमित्त ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. विशेषतः रुग्णवाहिका, शाळेच्या बसेस आणि दुध-भाजी वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही वळसा घालावा लागेल.
रेल्वे प्रशासनाने याबाबतचे पत्र स्थानिक पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय, ग्रामपंचायत कासारवाडी, आगार प्रमुख, रेल्वे सुरक्षा बल तसेच संबंधित सर्व विभागांना पाठवले असून, फाटकाजवळ पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तरीही नागरिकांनी शक्य तितक्या आधीच प्रवासाची योजना करावी आणि पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“ट्रॅक दुरुस्तीचे हे काम अपरिहार्य आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्हाला खेद आहे, पण सुरक्षिततेसाठी सर्वांनी सहकार्य करावे,” असे मध्य रेल्वेचे अभियंता बी. बी. पेंढारकर यांनी सांगितले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या