**बार्शी शहरात अवैध दारू विक्री आणि जुगारावर पोलिसांची धडक कारवाई**
**बार्शी शहरात अवैध दारू विक्री आणि जुगारावर पोलिसांची धडक कारवाई**
**KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी) : बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवैध दारू विक्री आणि जुगाराच्या विरोधात धडक कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 28 लिटर अवैध देशी दारू आणि जुगार साहित्यासह 400 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई 18 आणि 19 डिसेंबर 2025 रोजी विविध ठिकाणी करण्यात आली असून, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) आणि महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या आदेशानुसार, पोलिस कॉन्स्टेबल सचिन भारत देशमुख (बकल नं. 1974), राहुल राजाभाऊ उदार (बकल नं. 200), बाळकृष्ण यशवंत मुठाळ (बकल नं. 996) आणि इतर सहकाऱ्यांनी गोपनीय बातमीदारांच्या माहितीवरून ही मोहीम राबवली. पहिल्या कारवाईत 19 डिसेंबरला दुपारी 6.12 वाजता परंडा रोडवरील घाडगे प्लॉटजवळील पत्र्याच्या शेडमागे सचिन रमेश माने (वय 38, रा. तांदुळवाडी) याला 10 लिटर अवैध दारूसह पकडण्यात आले. दारूची किंमत 1000 रुपये असून, त्याला परवाना नसल्याने 180 मिली सॅम्पल घेऊन उर्वरित दारू जागेवर नष्ट करण्यात आली.
दुसऱ्या कारवाईत त्याच दिवशी दुपारी 5.20 वाजता सोलापूर रोडवरील राणी लक्ष्मीबाई उद्यानाच्या भिंतीलगत अविनाश चंद्रकांत नवगिरे (वय 55, रा. राजपूत चाळ) याला कल्याण मटका जुगार खेळताना अटक करण्यात आली. त्याच्याकडून 400 रुपये रोख, अंक-आकडे लिहिलेले कागद आणि बॉलपेन जप्त करण्यात आले.
तिसऱ्या कारवाईत 19 डिसेंबरला दुपारी 4.40 वाजता संतोषी माता चौक, सुभाष नगर येथे दत्तात्रय संभाजी सावंत (वय 45, रा. संतोषी माता चौक) याला 10 लिटर अवैध दारूसह पकडले. दारूची किंमत 1000 रुपये असून, सॅम्पल घेऊन उर्वरित नष्ट करण्यात आली.
चौथ्या कारवाईत 18 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजता टिळक चौक, सुभाष नगर येथे नाना सिद्राम चौगुले (वय 42, रा. झाडबुके मैदान) याला 8 लिटर अवैध दारूसह अटक करण्यात आली. दारूची किंमत 800 रुपये असून, त्यावरही सॅम्पल घेऊन नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात आली.
या सर्व कारवायांमध्ये पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत जप्ती पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, शहरात अवैध धंद्यांविरोधात मोहीम सुरूच राहणार असून, नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या