**ॲट्रॉसिटी प्रकरणात धक्कादायक निर्णय : तलवारीने मारहाण करणाऱ्या आरोपीला बार्शी न्यायालयाचा जामीन!**
**ॲट्रॉसिटी प्रकरणात धक्कादायक निर्णय : तलवारीने मारहाण करणाऱ्या आरोपीला बार्शी न्यायालयाचा जामीन!**
**KDM NEWS प्रतिनिधी प्रतिनिधी : वैराग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी आणि गंभीर मारहाण प्रकरणातील आरोपी योगेश बाळकृष्ण हजारे याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.के. मांडे यांनी हा आदेश दिला.
घटना २६ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली. फिर्यादी सचिन गोविंद मोहिते हे मोटारसायकलवरून भाजी खरेदीसाठी जात असताना आरोपीने त्यांना दुकानात बोलावले. तेथे जातीवाचक शिवीगाळ करून 'टायरची रिम का बदललीस' असा प्रश्न विचारत तलवारीने आणि शॉकअप्सर पाईपने डोक्यात व डाव्या हातावर मारहाण केली. याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३), आर्म्स ॲक्ट १९५९ कलम ४ व २५ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला.
आरोपीच्या वतीने ॲड. राहुल पाटील यांनी जामीन अर्ज सादर केला. सुनावणीदरम्यान फिर्याद आणि वैद्यकीय अहवालातील विसंगती दाखवून युक्तिवाद केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून जामीन मंजूर केला. आरोपीच्या बाजूने ॲड. विवेक गजशिव, ॲड. श्रीराम काशीद आणि ॲड. राजकुमार गुंड यांनी काम पाहिले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या