*कोल्हापूर ACBच्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा कर्नाटकात भीषण अपघात; आईसह चालकाचा मृत्यू, तिघे जखमी*

*कोल्हापूर ACBच्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा कर्नाटकात भीषण अपघात; आईसह चालकाचा मृत्यू, तिघे जखमी* 

*KDM NEWS कोल्हापूर | प्रतिनिधी  
कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) प्रमुख DYSP वैष्णवी पाटील (वय ४५) यांच्या कारचा कर्नाटकातील चित्रदुर्ग तालुक्यातील तमटकल्लू गावाजवळ भीषण अपघात झाला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पहाटे ४ ते ४:३० च्या सुमारास ही घटना घडली. अपघातात वैष्णवी पाटील यांच्या आई कमल हरिभाऊ पाटील (वय ६९) आणि चालक राकेश अर्जुन ऐवळे (वय ३९) यांचा जागीच मृत्यू झाला, तर DYSP वैष्णवी पाटील, त्यांच्या मामी कुसुम प्रल्हाद पाटील (वय ५७) आणि पोलीस कॉन्स्टेबल उदय दत्तात्रेय पाटील (वय ३८) हे तिघे गंभीर जखमी झाले.

प्राथमिक माहितीनुसार, वैष्णवी पाटील कुटुंबीयांसह रामेश्वरम येथे लग्नसमारंभाला गेल्या होत्या आणि बंगळुरूमार्गे कोल्हापूरला परत येत असताना हा अपघात घडला. चालक राकेश ऐवळे यांनी ७-८ तास सलग वाहन चालवल्याने डुलकी लागून गाडीचा ताबा सुटला आणि ती मागील बाजूला उभ्या असलेल्या एका मल्टी-एक्सल ट्रकला जोरदार धडकली. या धडकेत SUV कारचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर झाला.

जखमींना तातडीने चित्रदुर्गातील बसवेश्वर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, DYSP वैष्णवी पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्या धक्क्यातून सावरत आहेत, पण उपचार सुरू आहेत. अन्य दोघांचीही स्थिती गंभीर आहे. मृत कमल पाटील आणि कुसुम पाटील या सांगली जिल्ह्यातील कांडे गावच्या रहिवासी होत्या, तर चालक राकेश ऐवळे हे निपाणी गावचे (कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर) होते.

चित्रदुर्ग पोलिसांच्या DYSP दिनकर पीके यांनी घटनास्थळ आणि रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी चालकाची डुलकी आणि वेगवान वाहन चालवणे हे मुख्य कारण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी CCTV फुटेज, वाहनांच्या गती आणि चालकाच्या स्थितीचा तपास सुरू केला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलिसांनीही या घटनेची दखल घेतली असून नातेवाईकांना कळवण्यात आले आहे.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**