*अक्कलकोट दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात; पाच जणांचा दुर्दैवी अंत, एक महिला जखमी*

*अक्कलकोट दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात; पाच जणांचा दुर्दैवी अंत, एक महिला जखमी* 

**KDM NEWS प्रतिनिधी मोहोळ : पनवेल येथील भाविक अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाले असता, त्यांच्या प्रवासाला काळाने ग्रासले. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवडी पाटी गावाजवळ शनिवारी (१७ जानेवारी) रात्री साडेअकरा वाजता झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली.

एरटीगा कार (क्र. एमएच-४६ झेड-४५३६) मध्ये एकूण सहा प्रवासी होते, ज्यात तीन पुरुष आणि तीन महिला मित्र होते. भरधाव वेगात असलेल्या कारचा चालकाचा ताबा सुटल्याने ती रस्त्याकडेच्या झाडावर जोरदार आदळली. धडक इतकी जबर होती की कार पूर्णपणे विद्रूप झाली आणि रस्त्यापासून १०-१५ फूट दूर झुडपात फेकली गेली. यात पाच प्रवाशांचा घटनास्थळीच अंत झाला.

जखमी झालेल्या महिलेचे नाव ज्योती जयदास टाकले (वय अज्ञात, रा. सेक्टर ७, पनवेल, जि. रायगड) असून, तिला तातडीने मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह वाहनात अडकलेले असल्याने काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, अपघाताचे नेमके कारण आणि मृतांची ओळख शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेने महामार्गावरील वेगवान वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी वाहन जप्त केले असून, चौकशी सुरू आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**