*बार्शीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नगराध्यक्षा व सखी सम्राज्ञींचा सत्कार संपन्न*
*बार्शीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नगराध्यक्षा व सखी सम्राज्ञींचा सत्कार संपन्न*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. ११ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बार्शी संचार आणि मिळून साऱ्याजणीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विद्यमान नगराध्यक्षा तेजस्विनी प्रशांत कथले आणि प्रमुख व्याख्यात्या डॉ. प्रा. तेजस्विनी कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात २०२५ मधील 'सखी सम्राज्ञी' सन्मानित महिलांनाही गौरवण्यात आले. कार्यक्रम राधिका प्युअर व्हेज हॉलमध्ये ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन झाले. मिळून साऱ्याजणीच्या सदस्या ममता कुरमुरे यांनी प्रास्ताविक केले. सत्कार सोहळ्यात संदीप मठपती आणि शिल्पा मठपती यांच्या हस्ते नगराध्यक्षा कथले आणि डॉ. कांबळे यांचा गौरव करण्यात आला. यानंतर मिळून साऱ्याजणीच्या सदस्यांनी पद्यगीत नृत्य सादर केले.
प्रमुख व्याख्यात्या डॉ. तेजस्विनी कांबळे म्हणाल्या, "जो मालक असतो तो चालक असतो. महिलांनी आपल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन अर्थार्जन करावे. आपण महत्त्वाचे आहोत कारण पैसा आपण मिळवणार आहोत. आरोग्याकडे लक्ष देऊन मिळवलेल्या पैशाचे योग्य विभाजन करावे. त्यातून महिलांच्या विकासाला चालना मिळते."
२०२५ मध्ये बार्शी संचार यूट्यूब चॅनेलवर सन्मानित 'सखी सम्राज्ञी' महिलांचा गौरव नगराध्यक्षा कथले आणि डॉ. कांबळे यांच्या हस्ते झाला. यात डॉ. वैशाली प्रशांत मोहिरे (एम.डी. आयुर्वेद, गर्भसंस्कार), प्रियंका रत्नाकर स्वामी (मॅनेजर, व्यापारी सहकारी बँक), उल्का नवजीवन डोंबे (नेहा टेलरिंग फर्म), दिपाली प्रसाद सहस्त्रबुद्धे (संगीत विशारद), हेमा दीपक उपरे (सौंदर्यतज्ञ), विजया दत्तात्रय सुतार (बालवाडी शिक्षिका), वैशाली महेश नांदेडकर (शिव कलेक्शन साडी सेंटर), डॉ. श्रद्धा रोहन पाटील (स्त्रीरोग तज्ञ), सविता नरेंद्र वायकर (कलानिपुण), स्मिता दिलीप लुकडे (निवृत्त शिक्षिका, एमआयटी), डॉ. प्रीती महेश तोष्णीवाल (आहारतज्ञ), अनुराधा महेश स्वामी (अंगणवाडी सेविका), तृप्ती तुषार गदगी (शिवण क्लास संचालिका), ममता विकास कुरमुरे (कंप्यूटर सेंटर) आणि माधवी योगेश बरीदे (बालवाडी शिक्षिका) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा संदीप मठपती यांनी केले, तर आभार दाक्षायणी प्रभूराज स्वामी यांनी मानले. आयोजक संदीप मठपती आणि मिळून साऱ्याजणीच्या सदस्यांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वी झाला. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने वातावरण उत्साही राहिले. कार्यक्रमाची सांगता दिपाली प्रसाद सहस्त्रबुद्धे यांच्या पसायदानाने झाली.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या