*सकाळी घरातून गायब, दुपारी झाडाला लटकलेला मृतदेह! ३३ वर्षीय युवकाची गळफासाने आत्महत्या*

*सकाळी घरातून गायब, दुपारी झाडाला लटकलेला मृतदेह! ३३ वर्षीय युवकाची गळफासाने आत्महत्या* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. १०  : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मालवंडी गावाजवळील बाळोबाच्या माळावर एका ३३ वर्षीय युवकाने गायरानातील झाडाला सुती पांढऱ्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. मृत युवकाचे नाव कृष्णा राम चौगुले असून, तो मानेगाव (ता. माढा) येथील रहिवासी होता.

घटनेची माहिती मृताच्या चुलत भावाने बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दिली. माहितीनुसार, आज सकाळी १० वाजता कृष्णा राम चौगुले घरातून कोणालाही न सांगता बाहेर निघून गेला. त्याचे वडील राम चौगुले आणि भाऊ राजकुमार चौगुले यांनी गावात व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला; मात्र, तो सापडला नाही. दुपारी २ वाजता मानेगावातील तानाजी लांडगे यांनी कृष्णाच्या चुलत भावाला फोन करून घटनेची माहिती दिली.

घटनास्थळी पोहोचल्यावर कृष्णा राम चौगुले झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आणि त्याचा मृत्यू झाल्याची खात्री झाली. यावेळी मृताचे वडील राम चौगुले, भाऊ राजकुमार चौगुले तसेच गावातील नारायण सुळे, लक्ष्मण चौगुले यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते. मृत कृष्णा हा मानेगाव येथे कुटुंबासह राहत होता.

बार्शी तालुका पोलिस ठाण्यात याबाबत खबर देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**