*राजा माने अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष*

*राजा माने अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष* 
*KDM NEWS प्रतिनिधी कोल्हापूर, दि. १५: ** अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय आणि राज्य कार्यकारिणीच्या निवडी कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आल्या. यात वरिष्ठ संपादक राजा माने यांची केंद्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. ही संघटना देशातील सर्वात मोठी डिजिटल मीडिया पत्रकारांची संस्था असून, देशभरात १२ हजारांहून अधिक सदस्य आहेत. राजा माने हे संघटनेचे संस्थापक असून, त्यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मीडियाला शासकीय जाहिराती आणि मान्यता मिळवण्यासाठी यशस्वी प्रयत्न झाले आहेत.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सांगोला (सोलापूर) येथील सतीश भाऊ सावंत, राज्य महासचिवपदी कराड येथील विकास भोसले, प्रदेश उपाध्यक्षपदी अहिल्यानगर येथील इकबाल शेख यांची निवड झाली. केंद्रीय उपाध्यक्षपदी महेश कुगावकर आणि अमोल पाटील, राष्ट्रीय सचिवपदी तेजस राऊत, संघटनेच्या साप्ताहिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय कदम, गोवा प्रदेशाध्यक्षपदी अनिल पाटील आणि मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण कुमार खारीवाल यांचीही निवड करण्यात आली.

या बैठकीला प्रतिबिंब प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक नलवडे, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे, राज्य समन्वयक गणेश बोतालजी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, सांगली जिल्हाध्यक्ष मनोहर पवार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष रमेश नेटके, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ साखरे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. ही निवड डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी संघटनेच्या प्रयत्नांना नवे बळ देईल, असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल