**बार्शी तालुक्यात अवैध वाळू उत्खनन: दोन ट्रॅक्टर, एक जेसीबी जप्त; तीन आरोपींवर गुन्हा दाखल**

*बार्शी तालुक्यात अवैध वाळू उत्खनन: दोन ट्रॅक्टर, एक जेसीबी जप्त; तीन आरोपींवर गुन्हा दाखल*

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. २१ फेब्रुवारी २०२६ :  सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील ढोराळे गावातील भोगावती नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करताना तहसीलदारांच्या आदेशानुसार पथकाने धाड टाकली. या कारवाईत दोन ट्रॅक्टर, एक ट्रॉली आणि एक जेसीबी जप्त करण्यात आले असून, तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई सुरू आहे.

मंडळ अधिकारी सारिका धोंडीराम राऊत (वय ३६, रा कासारवाडी रोड, बार्शी यांनी दिलेल्या जबाबानुसार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १.१५ वाजता तहसील कार्यालय बार्शी येथून तहसीलदारांच्या आदेशानुसार पथकाने ढोराळे येथील भोगावती नदीपात्राची तपासणी केली. पथकात मंडळ अधिकारी सौंदरे यू. एच. डोईफोडे, ग्राम महसूल अधिकारी सौंदरे मोहिते, कुसळम औदुंबर शिंदे, वैराग सचिन शिंदे, देवगाव विनोद मुंढे, ढोराळे रमाकांत देशमुख आणि वैराग पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल २२१२ चव्हाण व १०८४ पठाण यांचा समावेश होता.

नदीपात्रात सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीपासून दक्षिणेकडे आणि बंधाऱ्याच्या उत्तरेकडे असलेल्या भागात दोन ट्रॅक्टर, एक ट्रॉली आणि एक जेसीबी आढळले. यात न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच १३ क्यूटी २२१९ (त्यावर बप्पा शिंदे, मो. ८८०६१२२***, भार्गवराजे आणि शिवराजे अशी नावे लिहिलेले), दुसरा न्यू हॉलंड कंपनीचा बिनक्रमांक ट्रॅक्टर (चेसी क्रमांक एमएचएन३६३०ओझेडएचएन४०७३०२) आणि जेसीबी क्रमांक एमएच ४६ बी १३१९ यांचा समावेश होता. ट्रॉलीत अंदाजे सव्वा ब्रास वाळू भरलेली होती, जी नदीपात्राबाहेर काढण्याच्या तयारीत होती.

पथकाने आरोपींना विचारले असता त्यांनी नावे सांगितली: १) ट्रॅक्टर चालक मंगेश परमेश्वर आंबेकर (वय २५, रा. इर्ले, ता. बार्शी), २) ट्रॅक्टर चालक दशरथ रामा काकडे (वय ४०, रा. ढोराळे, ता. बार्शी), ३) जेसीबी ऑपरेटर गणेश रघुनाथ शेळके (वय १९, रा. सुर्डी, ता. बार्शी). हे तिघे संगनमताने शासनाचा कोणताही पास किंवा परवानगी न घेता वाळू चोरी करत होते. या कारवाईमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे आरोपींना माहीत असूनही ते फायद्यासाठी हे करत होते.

जप्त मुद्देमालाचे मूल्य अंदाजे: १) बिनक्रमांक ट्रॅक्टर आणि ट्रॉली - ५ लाख रुपये, २) क्रमांक एमएच १३ क्यूटी २२१९ ट्रॅक्टर आणि ट्रॉली - ५ लाख रुपये, ३) जेसीबी - १० लाख रुपये, ४) सव्वा ब्रास वाळू - ७,५०० रुपये. एकूण २० लाख ७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पथकाने पंचनामा करून हा मुद्देमाल पोलिस ठाण्यात हजर केला.

या प्रकरणी बी.एन.एस. कलम ३०३(२), ३२६(ब) ३(५) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ९ व १५ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सारिका राऊत यांचा जबाब टंकलिखित करून घेण्यात आला असून, त्यांनी तो बरोबर असल्याचे सांगितले. पोलिस हवालदार ६२९ सानप यांनी जबाब नोंदवला.

या घटनेमुळे बार्शी तालुक्यातील नदीपात्रातील अवैध उत्खननावर प्रशासनाची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**