*मोहोळ एसटी स्टँडसमोर संभाजी महाराज पुतळा प्रकरण तापले; प्रशासनाच्या हटवण्याच्या प्रयत्नांना स्थानिकांचा जोरदार विरोध, तणाव वाढला*
*मोहोळ एसटी स्टँडसमोर संभाजी महाराज पुतळा प्रकरण तापले; प्रशासनाच्या हटवण्याच्या प्रयत्नांना स्थानिकांचा जोरदार विरोध, तणाव वाढला*
प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अखत्यारीत येते. त्यामुळे कायद्याच्या दृष्टिकोनातून या अनधिकृत उभारणीस वैधता नाही. पुतळा काढण्यासाठी आवश्यक कारवाई सुरू करण्यात आली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले की, वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यास पुतळा हटवण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
दरम्यान, या निर्णयाला मोहोळवासीयांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शंभूप्रेमी गटांनी पुतळा काढल्यास शहर बंद करण्याचा इशारा दिला आहे. "संभाजी महाराजांच्या स्मृतीला अपमान झाल्यास आम्ही शांत बसणार नाही," अशी भूमिका स्थानिकांनी घेतली. यामुळे शहरात गालबोट लागले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. अतिरिक्त पोलिस फौज तैनात करण्यात आली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर शंभूप्रेमी आणि एनएचएआय अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. दोन्ही बाजूंच्या चर्चेतून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. मोहोळ शहरातील हे प्रकरण आता वरिष्ठ पातळीवर गेले असून, पुढील कारवाईची दिशा लवकरच स्पष्ट होईल.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या