**बार्शी : बालब्रह्मचारी तपस्वी कुमारांसाठी द्विदिवसीय राजयोग तपस्या कार्यक्रमाचा शुभारंभ**

*बार्शी : बालब्रह्मचारी तपस्वी कुमारांसाठी द्विदिवसीय राजयोग तपस्या कार्यक्रमाचा शुभारंभ* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. २८ फेब्रुवारी : सोलापूर उपक्षेत्रातील बालब्रह्मचारी तपस्वी कुमारांसाठी ब्रह्माकुमारीज बार्शी सेवाकेंद्रात आजपासून द्विदिवसीय राजयोग तपस्या (योग भट्टी) कार्यक्रम सुरू झाला. २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दोन दिवसांत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेले तपस्वी कुमार व प्रेरक वक्ते ब्रह्मकुमार राजीव गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन आज सायंकाळी ११.३० वाजता सेवाकेंद्राच्या नवनिर्मित राजयोग भवनात झाले. सेवाकेंद्र संचालिका ब्रह्मकुमारी संगीता दिदी, ब्रह्मकुमार राजीव गुप्ता आणि सोलापूर उपक्षेत्रातील राजयोग शिक्षिका बहिणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी संगीता दिदी व निशा दिदी यांनी राजीव गुप्ता व सर्व राजयोग शिक्षिका बहिणींचे तिलक, पुष्पगुच्छ व प्रसाद देऊन स्वागत केले.

स्वागतपर मनोगतात संगीता दिदी म्हणाल्या, “राजीवभाईंच्या सान्निध्यात दोन दिवसांचा काळ यशस्वी करून सर्व कुमारांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपस्या करावी. स्वतःला शक्तीच्या खजिन्यांनी भरभरून करावे आणि विद्यालयाचे साकार संस्थापक आदिपिता ब्रह्माबाबांसारखे जीवन घडवण्याचा निश्चय करावा.”

ब्रह्मकुमार राजीव गुप्ता यांनी आपल्या भाषणात सांगितले, “मनातील भावना जशा असतात तशा शरीरात संवेदना निर्माण होतात. संकल्पांची गती कमी करून शांतीचा अनुभव घेणे आणि मनोबल वाढवणे हा या तपस्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.” त्यांनी क्रिएटिव्ह मेडिटेशनचे (रचनात्मक योगसाधना) विविध प्रयोग करवले. फलाहार सेवनाच्या वेळीदेखील या प्रयोगांचा समावेश करण्यात आला.

पहिल्या दिवशी सोलापूर उपक्षेत्रातील ५० कुमारांपैकी २५ जणांनी उपस्थिती नोंदवली. राजयोग भवनातील स्वच्छता, शांत वातावरण आणि सुव्यवस्थित नियोजन पाहून उपस्थित कुमारसेना भारावून गेली. पहिल्या सत्राच्या समारोपाच्या वेळी उपक्षेत्र संचालिका सोमप्रभा दिदींचे आगमन झाल्याने उपस्थित कुमारांचा आनंद द्विगुणित झाला.

दोन दिवसांच्या या कार्यक्रमात राजयोग तपस्येच्या विविध पैलूंचा सखोल अभ्यास व अनुभव घेण्यात येणार आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**