*तुळजाभवानी मंदिरात होळी व चंद्रग्रहणामुळे पूजा-विधींच्या वेळापत्रकात बदल*
*तुळजाभवानी मंदिरात होळी व चंद्रग्रहणामुळे पूजा-विधींच्या वेळापत्रकात बदल*
*KDM NEWS प्रतिनिधी तुळजापूर : होळी (शिमगा) सण आणि ३ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने पूजा-विधींच्या वेळापत्रकात बदल जाहीर केले आहेत. मंदिर प्रशासनाने महंत, पुजारी, सेवेकरी आणि भाविकांसाठी विशेष सूचना जारी केली आहे.
मंदिराचे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, *२ मार्च २०२६ (सोमवार)* रोजी होळी सणानिमित्त अभिषेक पूजेची घाट सायंकाळी ६.०० वाजता होईल. त्यानंतर रात्री ८.०० वाजता आरती व धुपारती करण्यात येईल.
*३ मार्च २०२६ (मंगळवार)* रोजी सायंकाळी होणाऱ्या चंद्रग्रहणामुळे (दुपारी ३.२० ते सायंकाळी ६.४७ पर्यंत) पूजा-विधींमध्ये खास बदल करण्यात आले आहेत. ग्रहणकाळात मंदिरातील पूजा बंद राहते आणि देवीला सोवळ्यात ठेवण्याची परंपरा पाळली जाते. यानुसार वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल :
- सायंकाळी ६.१५ ते ६.४० : घाट देणे, पुजेस हाक मारणे, पुजारी श्रीदेवीजवळ येणे व निर्माल्य विसर्जन.
- ६.४४ ते ६.४८ : चंद्रग्रहण कालावधीत श्रीदेवींना सोवळ्यात ठेवणे.
- सायंकाळी ६.५५ ते रात्री ९.०० : सिंहासन पूजा, पंचामृत स्नान, शुद्धस्नान, आरती व धुपारती.
हे बदल सुतक काळ व ग्रहण नियमांचे पालन करण्यासाठी करण्यात आले असून, सर्व भाविक व संबंधितांनी याची नोंद घेऊन मंदिरात यावे, असे मंदिर प्रशासनाचे आवाहन आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या