*सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची कोलंबिया संसदीय निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती*

*सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची कोलंबिया संसदीय निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती* 

*KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, २७ फेब्रुवारी :** सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांची कोलंबियातील संसदीय निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम सेथुरामन यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय भारतीय शिष्टमंडळ ६ ते १० मार्च २०२६ दरम्यान कोलंबिया प्रजासत्ताकात दौऱ्यावर जाणार असून, ८ मार्चला होणाऱ्या काँग्रेस (संसदीय) निवडणुकीचे निरीक्षण करणार आहे.

कोलंबियाच्या Consejo Nacional Electoral (राष्ट्रीय निवडणूक परिषद) कडून भारत निवडणूक आयोगाच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य उपक्रमांतर्गत हे आमंत्रण प्राप्त झाले आहे. शिष्टमंडळात कुमार आशीर्वाद यांच्यासोबत संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर रामचंद्र पारकर, रामटेकचे निवडणूक नोंदणी अधिकारी प्रीयेश महाजन आणि नाशिकचे बूथ लेव्हल अधिकारी सागर शिर्के यांचा समावेश आहे.

दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारतीय निवडणूक व्यवस्थेची पारदर्शकता, तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धती जागतिक स्तरावर सादर करणे तसेच कोलंबियातील मतदार नोंदणी, मतदान प्रक्रिया आणि सुरक्षा व्यवस्था यांचा अभ्यास करून दोन्ही देशांमध्ये अनुभव विनिमय करणे हे आहे. कोलंबिया ८ मार्च २०२६ रोजी संसदीय निवडणूक घेणार असून, त्यानंतर मे महिन्यात राष्ट्रपती निवडणूक होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब असून, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या माध्यमातून भारतीय निवडणूक आयोगाची जागतिक विश्वासार्हता अधिक मजबूत होणार आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र राज्याला मिळालेली विशेष जबाबदारी मानली जात आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**