*चिखला गावात शिवरायांच्या पुतळ्यावरून हिंसक वाद; महिलांवर हल्ले, बार्शी युवा सेनेचे आंदोलन**

*चिखला गावात शिवरायांच्या पुतळ्यावरून हिंसक वाद; महिलांवर हल्ले, बार्शी युवा सेनेचे आंदोलन*

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. २१ फेब्रुवारी २०२६ : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उभारलेल्या पुतळ्यावरून वाद चिघळला. विरोधकांनी पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला, दगडफेक झाली आणि महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हिंसक घटनेत उबाठा शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांसह अनेक महिलांना मारहाण झाली.

गावातील सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप आहे. लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू आहे, परंतु अद्याप कोणतीही अटक झालेली नाही.

या निंदनीय घटनेचा निषेध करत बार्शी युवा सेनेने तहसील कार्यालयात आंदोलन करून निवेदन दिले. सरपंच व सहभागींवर  *मोक्का* अंतर्गत तत्काळ कारवाई आणि अटक करण्याची मागणी केली. शासनाने कारवाई न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींचा उद्रेक होईल, असा इशारा देण्यात आला.

आंदोलनात युवा सेना शहरप्रमुख हर्षवर्धन पाटील, युवती सेनेच्या रजनी पाटील, नगरसेवक आकाश राऊत, राष्ट्रवादीचे महेश चव्हाण, शिवसेना पदाधिकारी मंगलताई पाटील, दिनेश नाळे आदी उपस्थित होते. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले असून, पीडित कुटुंबांना संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. गावात सध्या तणाव कायम असून, शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**