*बार्शी शहर पूर्णपणे भोंगेमुक्त ? पोलीसांची कठोर कारवाई: ८ मस्जिदींवरील १४ भोंगे, ५ मंदिरांवरील ८ भोंगे उतरवले*

*बार्शी शहर पूर्णपणे भोंगेमुक्त ? पोलीसांची कठोर कारवाई: ८ मस्जिदींवरील १४ भोंगे, ५ मंदिरांवरील ८ भोंगे उतरवले* 
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २८ फेब्रुवारी २०२६ :** बार्शी शहर पोलीस ठाण्याने आज अनधिकृत भोंग्यांविरुद्ध मोहीम राबवत शहराला पूर्णपणे भोंगेमुक्त केले. यात ८ मस्जिदींवरील १४ भोंगे आणि ५ मंदिरांवरील ८ भोंगे काढण्यात आले. ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या धार्मिक स्थळांवरील आवाज नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आली.

मागील काही दिवसांपूर्वी बार्शी शहर पोलीस ठाण्याने सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांच्या विश्वस्तांसोबत शांतता बैठक घेतली होती. त्यात भोंगे काढण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरात एका घटनेमुळे तणाव निर्माण झाल्याने पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तातडीने शांतता समितीची बैठक बोलावली. या बैठकीत अधीक्षक कुलकर्णी यांनी सर्व धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे काढण्याचे कडक निर्देश दिले होते.

त्यानुसार आज दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी आपल्या स्टाफसह ही मोहीम राबविली. प्रथम ११ मस्जिदींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८ मस्जिदींवरील एकूण १४ भोंगे काढण्यात आले. त्याचबरोबर ५ मंदिरांवरील ८ भोंगेही उतरवण्यात आले. ही संपूर्ण कारवाई शांततेने, सहकार्याने आणि कोणत्याही तणावाशिवाय पार पाडण्यात आली.

कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यात सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर ढोरे, पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे, महिला पोलिस उपनिरीक्षक सोनम जगताप, एएसआय अजित वरपे व इतर कर्मचारी सहभागी होते.

बार्शी पोलीस ठाण्याने स्पष्ट केले की, ही केवळ एक सुरुवात आहे. भविष्यात अनधिकृत भोंग्यांवर आणि ध्वनी प्रदूषणाच्या कोणत्याही उल्लंघनांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहणार आहे. शहरातील नागरिकांना शांत आणि प्रदूषणमुक्त वातावरण मिळावे, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**