**नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला ६८वा 'महाराष्ट्र केसरी'; सातवा 'डबल महाराष्ट्र केसरी'चा मान मिळवला**

**नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला ६८वा 'महाराष्ट्र केसरी'; सातवा 'डबल महाराष्ट्र केसरी'चा मान मिळवला** 

*KDM NEWS प्रतिनिधी पुणे :* नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुणे जिल्ह्यातील वाघोली (ता. हवेली) येथील स्व. अजितदादा पवार क्रीडानगरीत २२ मार्च रोजी झालेल्या अंतिम लढतीत त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा ४-३ असा पराभव केला. यासह सदगीर सातव्या ‘डबल महाराष्ट्र केसरी’ ठरला.

रामकृष्ण (अण्णा) सातव पाटील यांच्या आयोजनात आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने १८ ते २२ मार्चपर्यंत चाललेल्या स्पर्धेत ८०० हून अधिक पैलवानांनी भाग घेतला. गादी विभागात हर्षवर्धन सदगीरने जय पाटीलला १०-० ने चितपट केले, तर माती विभागात महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखला ३-० ने हरवले.

अंतिम सामन्यात दोन्ही पैलवान एकाच गुरू पैलवान काका पवार यांच्या तालमीचे शिष्य होते. पहिल्या सहा मिनिटांच्या हाफमध्ये १-१ बरोबरी झाली. दुसऱ्या हाफमध्ये गायकवाडला एक्टिव्हिटी टास्क मिळाल्यानंतर गुण न मिळाल्याने सदगीरला १ गुण मिळाला. त्यानंतर सदगीरने दोन गुणांची भर घातली. गायकवाडने शेवटच्या क्षणात १ गुण मिळवला, पण वेळ संपल्याने ४-३ असा निकाल लागला.

सदगीरने यापूर्वी २०१९ मध्ये प्रथम महाराष्ट्र केसरी पद मिळवले होते. गायकवाड दुसऱ्यांदा उपमहाराष्ट्र केसरी राहिला. स्पर्धेत शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील आणि गतविजेता पृथ्वीराज मोहोळ यांसारखे तीन माजी विजेते उपांतर फेरीत बाहेर पडले.

विजेत्या सदगीरला मामासाहेब मोहोळ कुटुंबीयांकडून चांदीची गदा, पाच लाख रुपये रोख आणि टोयोटा फॉर्च्युनर कार देण्यात आली. उपविजेत्या गायकवाडला स्कॉर्पियो कार व चार लाख रुपये मिळाले. ही स्पर्धा कुस्तीप्रेमींसाठी अभूतपूर्व ठरली.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल