**बार्शीमध्ये **नारी शक्तीचा भव्य सन्मान सोहळा**; डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात**

**बार्शीमध्ये **नारी शक्तीचा भव्य सन्मान सोहळा**; डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :** अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा पाचवा वर्धापन दिन आणि ‘नारी शक्ती’ विशेष सन्मान सोहळा ३० मार्च २०२६ रोजी बार्शी येथे भव्य रूपात आयोजित करण्यात आला आहे.

संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजा माने यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने ६व्या वर्षात पदार्पण करताना समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थापक मा. श्री. राजा माने यांच्याकडे असेल. प्रमुख उपस्थितीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, बार्शी आमदार दिलीप सोपल, राज्यसभा खासदार ज्योतीताई वाघमारे, सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सोहळ्यात सौ. अनु प्रसाद मोहिते (जीवन गौरव), ह.भ.प. शिवलीलाताई पाटील (कीर्तन रत्न), सौ. मनिषा भगवान लोकरे (समाजरत्न), सौ. सायरा नुह मुल्ला (क्रिडा रत्न), सौ. सारीका गिरीष संघवी (गौरव सन्मान) आणि श्रीमती मनिषा मुकुंद गुरव (आदर्श महिला वाहक सन्मान) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात बार्शी माजी आमदार राजेंद्र राऊत यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार असून, ती मा. राजा माने, मा. मयुर गलांडे आणि मा. निता देव यांच्या माध्यमातून घेतली जाईल.

संघटनेच्या बार्शी तालुका कार्यकारिणीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. हा सोहळा केवळ वर्धापन दिन नसून, नारी शक्तीच्या योगदानाचा सन्मान करणारा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**