**'तुमच्यावर कोप होईल' म्हणत धमकी; अटक केल्यानंतर अशोक खरातची पहिली प्रतिक्रिया**
३५ वर्षीय विवाहित महिलेच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यातील फिर्यादीनुसार, २०१९ मध्ये तिच्या भावाच्या ओळखीतून खरातशी भेट झाली. “दैवी शक्तीने सर्व अडथळे दूर करीन, श्रीमंत घरात लग्न होईल, करिअर उजळेल,” असे आश्वासन देत विश्वास संपादन केला. नोव्हेंबर २०२२ मध्ये कॅनडा कॉर्नर येथील ‘ओजस प्रॉपर्टीज’ कार्यालयात बोलावून चेंबरमध्ये पेढा व तांब्याच्या भांड्यातील पाणी (गुंगीचे औषध) दिले. डोकं जड होताच “तू माझी प्रेयसी बनून राहिली नाहीस तर परमेश्वराचा कोप होईल, तुझा नवरा मृत्युमुखी पडेल, मी तुला पवित्र करतोय,” अशी भीती घालून वारंवार बलात्कार केला. लग्नानंतरही ‘आशीर्वाद’ देण्याच्या बहाण्याने अत्याचार चालू ठेवला. डिसेंबर २०२५ पर्यंत हा प्रकार सुरू होता.
पोलिस तपासात खरातच्या कॅनडा कॉर्नर कार्यालयातून ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सीसीटीव्ही, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप जप्त. व्हिडिओत अनेक नामांकित महिला, सेलिब्रिटी, अधिकारी यांचे दृश्य; एका अल्पवयीन मुलीवर ‘केबल टेस्टर’ने अघोरी उपचार, महिलांना स्वतःची लघवी पाजणे, डोक्यावर तांब्या ठेवणे, पाठमोऱ्या उभे करणे असे धक्कादायक प्रकार समोर. कार्यालयीन कर्मचारी नीरज जाधवने व्हिडिओ ब्लॅकमेलसाठी वापरले; तोही अटकेत, शिर्डीत गुन्हा दाखल.
अटकेपूर्वी गुप्त ऑपरेशन : फार्महाऊसबाहेर “चोर-चोर” आरडाओरडा करून प्रवेश, बेडरूममधून थेट ताब्यात. फार्महाऊसवर रात्री उशिरा छापा – एक पिस्तूल, वापरलेले व न वापरलेले काडतुसे, ८ लाख रोख, मालमत्ता दस्तऐवज जप्त. मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर महादेव/शिवनिका संस्थान ट्रस्ट, शिर्डी-राहता परिसरात जमिनी, पाथर्डी (३० एकर, १५० कोटी+), कहांडळवाडी (४५ एकर), गौळाणे, कुंदेवाडी, निघोज (अहिल्यानगर) येथे एकूण २०० कोटींच्या आसपास मालमत्ता. नाशिकमध्ये १० कोटी फार्महाऊस, १ कोटी ऑफिस, ५ कोटी बंगला.
खरात हा मर्चंट नेव्ही निवृत्त, अंकशास्त्रज्ञ, ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ म्हणून प्रसिद्ध. रविवारी व्हीआयपी दरबार, श्रावणात महाप्रसाद स्पर्धा, मुंबई-दिल्लीपर्यंत देणग्या गोळा करून मंदिर बांधले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दीपक केसरकर, राज्य महिला आयोगाध्यक्षा रुपाली चाकणकर (ट्रस्ट सदस्य) यांच्यासह सेलिब्रिटींचे फोटो-व्हिडिओ व्हायरल; चाकणकर म्हणाल्या, “सामाजिक कार्यासाठी संबंध, वैयक्तिक आयुष्याबाबत माहिती नव्हती, तपासावर विश्वास.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन आठवड्यांपूर्वी फाईल पोहोचली, कारवाईचे आदेश दिले. राज्य सरकारने SIT स्थापन, नेतृत्व दबंग IPS तेजस्विनी सातपुते यांच्याकडे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गोपनीय टिप दिली. आणखी महिलांच्या तक्रारी येण्याची शक्यता; राजकीय नेते, अधिकारी, ट्रस्ट निधी, जमीन व्यवहार, परदेशी पळून जाण्याचा प्लॅन यांचा सखोल तपास.
न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली. नाशिकसह महाराष्ट्र हादरला आहे. विरोधकांकडून चाकणकर यांचा राजीनामा मागणी, अंधश्रद्धा निर्मूलनाची मागणी जोरात. पोलिस म्हणतात, “नेटवर्कमधील सर्व सहकारी उघड होतील, कठोर कारवाई होईल.”
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या