**बार्शी : जामगाव (आ) शिवारात ट्रान्सफॉर्मर तोडफोड; १.४५ लाखांचा मुद्देमाल चोरी**

**बार्शी : जामगाव (आ) शिवारात ट्रान्सफॉर्मर तोडफोड; १.४५ लाखांचा मुद्देमाल चोरी** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : ** सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील जामगाव (आ) शिवारात के. आर. अॅग्रो प्रायव्हेट कंपनीच्या परिसरातील २०० केव्हीए क्षमतेच्या महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरची अज्ञात चोरट्यांनी तोडफोड करून मोठी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे ४०० लिटर ट्रान्सफॉर्मर ऑइल आणि ५०० किलो अॅल्युमिनियम वायडिंग वायर चोरून नेल्याने महावितरण कंपनीला १ लाख ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

ही घटना २७ मार्च दुपार ते ३० मार्च सायंकाळी दरम्यान घडली. चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरचे तेल आणि वायर काढून नेले. यातील ऑइलची किंमत अंदाजे २० हजार रुपये तर अॅल्युमिनियम वायरची किंमत १ लाख २५ हजार रुपये इतकी आहे.

या प्रकरणी महावितरण कंपनीच्या बार्शी ग्रामीण २ विभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ श्रीकृष्ण भगवान चाटे (वय ४०) यांनी बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सहायक पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला असून, चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. उन्हाळ्याच्या हंगामात ही घटना घडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महावितरण कंपनीने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याचे सांगण्यात आले.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल