*“कुस्ती सोडतेय...” सोनाली मंडलिकचा भावनिक निरोप; ४० राष्ट्रीय पदके जिंकणाऱ्या खेळाडूला आर्थिक पाठबळ न मिळाल्याने टोकाचा निर्णय**
*“कुस्ती सोडतेय...” सोनाली मंडलिकचा भावनिक निरोप; ४० राष्ट्रीय पदके जिंकणाऱ्या खेळाडूला आर्थिक पाठबळ न मिळाल्याने टोकाचा निर्णय**
या पराभवानंतर ओपन गटात निवड न झाल्याने सोनाली प्रचंड निराश झाली. तिने लगेचच सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर करत कुस्तीला अखेरचा रामराम केल्याची घोषणा केली. आर्थिक अडचणी, स्पॉन्सरशिपचा अभाव, योग्य आहार न मिळणे आणि ६५ किलोपेक्षा वजन वाढवता न आल्याने ओपन गटात संधी गमावल्याची खंत तिने व्यक्त केली.
सोनाली मंडलिक ही सामान्य कुटुंबातील खेळाडू आहे. कापरेवाडी येथील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या तालमीतून तिने कुस्तीला सुरुवात केली. कोणत्याही आधुनिक सुविधा नसताना कठोर मेहनतीने तिने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नाव कमावले. ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत सुवर्णपदक, ४० वेळा राष्ट्रीय पदके, ओतूर येथील चांदीची गदा आणि रोख पारितोषिक अशा अनेक यशस्वी कामगिरी तिच्या नावावर आहेत. मंगळवेढा केसरी, जामनेर देवा भाऊ केसरीसह अनेक महत्त्वाच्या स्पर्धांत तिने मानकरी पदक पटकावले होते. ग्रामीण भागातील मुलींसाठी ती प्रेरणास्रोत ठरली होती.
मात्र आर्थिक पाठबळ, योग्य मार्गदर्शन आणि पोषण सुविधा न मिळाल्याने तिला हा निर्णय घ्यावा लागला. स्पर्धेनंतर तिने सोलापूर सोडत भावनिक व्हिडिओ पोस्ट केला. या निर्णयामुळे महिला कुस्ती वर्तुळात चिंता व्यक्त होत आहे. राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना भेडसावणाऱ्या आर्थिक आणि प्रशिक्षणाच्या अडचणी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
क्रीडातज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोनालीसारख्या जिद्दी खेळाडूला योग्य वेळी मदत मिळाली असती तर ती देशस्तरावर आणखी मोठ्या यशाची शक्यता होती. सध्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू असून, सोनालीच्या पराभवानंतर आणि निवृत्ती घोषणेनंतर स्पर्धेच्या पहिल्या दिवसाला भावनिक वळण लागले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या