**महाराष्ट्रात गॅस सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा चक्कर येऊन मृत्यू**
**महाराष्ट्रत गॅस सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा चक्कर येऊन मृत्यू**
**KDM NEWS प्रतिनिधी अकोला : राज्यातील घरगुती गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे लागलेल्या रांगेत उभे असताना अन्वी मिर्जापूर (ता. अकोला) येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा शनिवारी दुपारी अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला.
शिरसाट हे सकाळपासून अकोला शहरातील यदुराज एचपी गॅस एजन्सीसमोर आपल्या विधवा सूनेच्या गॅस बुकिंगसाठी रांगेत उभे होते. तासन्तास भीषण उन्हात आणि गर्दीत प्रतीक्षा केल्याने थकवा आला. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते खाली कोसळले. उपस्थित नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे अन्वी मिर्जापूर गावात शोककळा पसरली असून, गॅस वितरणातील गोंधळ आणि प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर ग्रामस्थांचा संताप व्यक्त होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या दुर्दैवी घटनेला ‘गॅस टंचाईचा पहिला बळी’ म्हटले आणि केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या