**सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड : उद्या विशेष बैठक, ओबीसी आरक्षण लागू**

**सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड : उद्या विशेष बैठक, ओबीसी आरक्षण लागू** 

*KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी उद्या बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद सोलापूर येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दुपारी २ वाजता सुरू होणार असून, अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड प्रक्रिया राबवली जाईल. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर ही पहिली महत्त्वाची बैठक आहे. अध्यक्ष पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी आरक्षित आहे.

**निवड प्रक्रियेचा कार्यक्रम :**

- सकाळी १० ते १२ : नामनिर्देशनपत्र स्वीकारणे  
- दुपारी २.०० : सभेची सुरुवात  
- २.०० पासून : नामनिर्देशनपत्रांची छाननी व उमेदवार घोषित करणे  
- २.१५ ते २.३० : उमेदवारी अर्ज मागे घेणे  
- २.३० पासून : निवडणुकीच्या कामकाजास सुरुवात (अध्यक्ष निवड होईपर्यंत)  

**उपाध्यक्ष पदासाठी :**  
- ३.०० : नामनिर्देशनपत्रांची छाननी व उमेदवार घोषित करणे  
- ३.१० ते ३.२५ : उमेदवारी अर्ज मागे घेणे  
- ३.२५ नंतर : निवडणुकीच्या कामकाजास सुरुवात (उपाध्यक्ष निवड होईपर्यंत)

**उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्रे :**  
१. जातीचा दाखला  
२. जातपडताळणी प्रमाणपत्र किंवा जातपडताळणी प्रस्ताव कार्यालयात जमा केल्याचे संबंधित कार्यालयाची पोहोच  
३. आधार कार्ड  

निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष जिल्हा परिषदेच्या विकासकामांसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**