**बार्शी : खळबळजनक घटना! जन्मदात्या मातेचे क्रूर कृत्य; ६ महिन्यांच्या बाळाचा गळा चिरला, ६ वर्षांच्या मुलीवर प्राणघातक हल्ला**
**बार्शी : खळबळजनक घटना! जन्मदात्या मातेचे क्रूर कृत्य; ६ महिन्यांच्या बाळाचा गळा चिरला, ६ वर्षांच्या मुलीवर प्राणघातक हल्ला**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**बार्शी तालुक्यातील पांगरी गावात एका आईने आपल्या दोन लहान मुलांवर निर्घृण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ६ महिन्यांच्या मुलाचा गळा चिरून हत्या करण्यात आली, तर ६ वर्षांच्या मुलीवर प्राणघातक वार केले गेले. या कृत्यानंतर आरोपी मातेने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.
पांगरी येथील या घरात सकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण बार्शी तालुका हादरला आहे. माता आपल्या दोन्ही मुलांवर एकाच वेळी हल्ला करून नंतर स्वतःला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिले. स्थानिकांनी तत्काळ मदत करत पोलिसांना कळवले. पांगरी पोलीस ठाण्यातील पथकाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती ताब्यात घेतली.
दोन्ही मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ६ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला, तर ६ वर्षांच्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. आरोपी मातेला ताब्यात घेण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पांगरी पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुटुंबातील आर्थिक अडचण, मानसिक तणाव किंवा अन्य वैयक्तिक कारण यामुळे ही घटना घडली असावी, असे प्राथमिक तपासात सूचित होत आहे.
या घटनेमुळे पांगरीसह बार्शी तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले असून, कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पोलिसांनी परिसरात सुरक्षा वाढवली आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या