**मराठा सेवा संघाच्या वतीने बार्शीत जिजाऊ ब्रिगेडचा भव्य पदग्रहण; महिलांच्या जबाबदारीला मान**

**मराठा सेवा संघाच्या वतीने बार्शीत जिजाऊ ब्रिगेडचा भव्य पदग्रहण; महिलांच्या जबाबदारीला मान** 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. १७ : मराठा सेवा संघ बार्शी शहर व तालुका शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग सेंटर, अलीपुर रोड येथे जिजाऊ ब्रिगेडचा पदग्रहण सोहळा आज यशस्वीरीत्या पार पडला. 

कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेच्या पूजनाने व जिजाऊ वंदनेने झाली. यानंतर ‘जिजाऊ ब्रिगेडची गरज काय?’, ‘महिलांचे समाजातील स्थान’, ‘महिला काय करू शकतात’ आणि माँसाहेब जिजाऊ यांच्या कार्याचा पट वाचून कार्यक्रमाला जिजाऊमय वातावरणात दमदार सुरुवात झाली. 

महिलांच्या सक्षमीकरण, महिला सुरक्षा, महिला अधिकारी पदे आणि महिलांची जबाबदारी या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

यावेळी महिलांचा सन्मान करण्यात आला. जिल्हाध्यक्ष उज्वला साळुंके, कविता राऊत, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, सभापती मीनाक्षी रोंगे, जिल्हा परिषद सदस्य भारती दराडे, नगरसेविका अर्चना बारस्कर, मीरा नाळे, कांचन मोहिते तसेच प्रशांत पाटील, गोरखा देशमुख आणि सूर्यकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना जिजाऊ ब्रिगेडचे संपूर्ण महाराष्ट्रभर चाललेले काम आणि त्याची महती सांगितली. 

यानंतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. 
- तालुका अध्यक्ष : विश्वरूपा शेळके 
- तालुका उपाध्यक्ष : मोहिनी बारंगुळे 
- सचिव : अर्चना चव्हाण 
- कार्याध्यक्ष : रूपाली राऊत 
- शहर अध्यक्ष : कांचन मोहिते 
- शहर उपाध्यक्ष : राजश्री देशमुख 

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी जिजाऊ ब्रिगेडचे काम अधिक चांगल्या पद्धतीने आणि प्रभावीपणे पुढे नेण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करून सोहळ्याची सांगता झाली.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**