**बार्शीमध्ये महिलांची भव्य मोटारसायकल रॅली; हिंदू नववर्षाला उत्साही सुरुवात**
रॅलीला बार्शी नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. गौरीताई रसाळ यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकावून सुरुवात झाली. सहभागी सर्व महिलांना श्रीराम नवमी मध्वर्ती उत्सव समितीच्या वतीने भगवे फेटे बांधण्यात आले. कलाधीश ढोल-ताशा पथकाने मंगल वादन करून वातावरण उत्साही बनवले.
रॅलीचा मार्ग श्रीराम मंदिर आणि भगवंत मंदिर मार्गे सुरू होऊन महाद्वार चौक, वीर सावरकर चौक, पटेल चौक, तुळशीराम रोड, रोडगा रस्ता, आडवा रस्ता, आर.एस.एम. हायट, बस स्टॅन्ड चौक, पोस्ट चौक, जूने पोलीस स्टेशन, सोमवार पेठ, नगर परिषद, नरवीर तानाजी चौक, संकेश्वर उद्यान, एकवीराई चौक आणि भगवंत मंदिर मार्गे शिव सृष्टी येथे समाप्त झाला.
समारोपस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून तसेच राम दरबार आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन झाले. यानंतर हिंदू संमेलनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
संमेलनाचे प्रास्ताविक सौ. सुनीती घारे यांनी केले. सौ. हर्षदा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. अश्विनी चव्हाण यांनी 'समाजातील पंच परिवर्तन' या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमास शेकडो महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी आणि मातृ शक्तीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या या रॅलीने बार्शी शहरात हिंदू नववर्षाच्या उत्साहाला नवे रूप दिले असून, एकता, शक्ती आणि सांस्कृतिक अभिमानाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या