**येडेश्वरी यात्रेत भाविकांना लुटणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त**

**येडेश्वरी यात्रेत भाविकांना लुटणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त** 

**KDM NEWS प्रतिनिधी धाराशिव - येरमाळा येथील प्रसिद्ध येडेश्वरी यात्रेदरम्यान गर्दीचा फायदा घेत महिला भाविकांच्या गळ्यातील मंगळसूत्रे चोरणाऱ्या टोळीला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी अंघोळीच्या ठिकाणी ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली. आरोपींकडून सुमारे १ लाख ३१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यात्रेतील गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी पायी गस्त घालत असताना संशयितांची हालचाल पाहून त्यांना ताब्यात घेतले. अंगझडतीत अनिल शेषेराव शिंदे याच्या खिशातून चार वेगवेगळी सोन्याची मंगळसूत्रे आढळली. चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, यात्रेत अंघोळीच्या ठिकाणी महिला भाविकांच्या गळ्यातील दागिने चोरून ते अनिलकडे जमा केले जात होते.

अटक केलेल्या तिघांची नावे अनिल शेषेराव शिंदे (३४), सुनिता अनिल शिंदे (२९) आणि हिराबाई रमेश शिंदे (४०, सर्व रा. इंदिरानगर, पाथरी, जि. परभणी) अशी आहेत. पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपींवर येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

येडेश्वरी यात्रेत लाखो भाविकांची गर्दी असते. स्थानिक गुन्हे शाखेने वेळीच टोळीवर कारवाई करून भाविकांच्या सुरक्षिततेची हमी दिली आहे.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल