**बार्शीत डिजिटल मीडिया पत्रकार संघाचा उत्साही पदग्रहण सोहळा;गणेश शिंदे शहर अध्यक्ष, संतोष कानगुडे ग्रामीण अध्यक्ष**
**बार्शीत डिजिटल मीडिया पत्रकार संघाचा उत्साही पदग्रहण सोहळा;
सोलापूर जिल्हा (पश्चिम) कार्यकारिणीने यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मानाचे फेटे बांधून नियुक्तीपत्र प्रदान केले. जिल्हा अध्यक्ष विनोद ननवरे (माझा न्यूज), उपाध्यक्ष विजय कोरे (महाराष्ट्र डिजिटल न्यूज), सचिव संजय बोकेफोडे (दैनिक लोकमत), सहसचिव बाबासाहेब शिंदे (दैनिक सकाळ) व खजिनदार अजय पाटील (विजेता टाइम्स) यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
**बार्शी शहर कार्यकारिणी**
अध्यक्ष : गणेश शिंदे (जी मराठी न्यूज व दैनिक संचार)
उपाध्यक्ष : अभिजीत शिंदे (व्हीएस मराठी न्यूज व दैनिक माझा मराठी समाचार)
सचिव : निलेश उबाळे (माय मराठी न्यूज व दैनिक सह्याद्रीचा राखणदार)
सहसचिव : अमीन गोरे (स्टार वन न्यूज)
खजिनदार : समाधान विधाते (एसव्ही मराठी न्यूज)
सदस्य : स्वप्निल पोफळे (समर्थ मराठी न्यूज), सचिन साळवे (फर्स्ट न्यूज), संदीप सुतार (आवाज माझा)
मार्गदर्शक : रमेश गायकवाड, रमण कारंजकर
कायदेशीर सल्लागार : शंकर ननवरे
**बार्शी ग्रामीण कार्यकारिणी**
अध्यक्ष : संतोष कानगुडे (दैनिक सकाळ)
उपाध्यक्ष : काशिनाथ शिरसागर (दैनिक पुढारी)
सचिव : विश्वनाथ सोनवणे (व्हीएस न्यूज ८६ व दैनिक लोकमत)
सहसचिव : राजेश भोगे (दैनिक दिव्य मराठी)
खजिनदार : बालाजी देवकते (दैनिक सह्याद्रीचा राखणदार व हटकर न्यूज मराठी)
सदस्य : शांतीलाल काशीद (दैनिक सकाळ), अर्जुन गोडगे (लोक वार्ता)
महिला आघाडी प्रमुख : राजश्री गवळी (लोकराज न्यूज २४ व दैनिक माझा मराठी समाचार)
सोहळ्यात “पारदर्शकता, कर्तव्यनिष्ठता आणि निष्पक्षता” या पत्रकारितेच्या मूलभूत मूल्यांवर भर देण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या नियमांचे काटेकोर पालन करून पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा देण्याचा आणि ग्रामीण भागातील पत्रकारांना सक्षम व्यासपीठ देण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमात नियम व अटींसह विविध विषयांवर चर्चा झाली. सर्वांनी मनोगत व्यक्त केले.
निलेश उबाळे यांनी सूत्रसंचालन केले तर अभिजीत शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर फोटोसेशन व अल्पोपहार झाला.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या