**बार्शी : रेणुका कला केंद्रात नर्तिकेवर नवऱ्याकडून भाल्यासारख्या चाकूने हल्ला; छाती-पोट-पाठीवर वार, गंभीर जखमी**

**बार्शी : रेणुका कला केंद्रात नर्तिकेवर नवऱ्याकडून भाल्यासारख्या चाकूने हल्ला; छाती-पोट-पाठीवर वार, गंभीर जखमी** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी  : येथील रेणुका कला केंद्र, जामगाव (आ) तालुका बार्शी येथे राहणाऱ्या २६ वर्षीय नर्तिका अश्विनी नागेश उर्फ नंग्या काळे यांच्यावर तिच्या नवऱ्याने चाकूसारखा दिसणारा लोखंडी भाला घेऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. घटना १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. अश्विनी यांना छातीच्या उजव्या बाजूला, पोटाच्या डाव्या बाजूला, डाव्या हाताच्या बोटावर आणि पाठीवर वार करून गंभीर जखमी करण्यात आले. सध्या त्यांच्यावर जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी येथे उपचार सुरू आहेत.

अश्विनी काळे यांचे लग्न जितेंद्र भोसले (रा. घाटपिंपरी, ता. वाशी, जि. धाराशिव) यांच्याशी झाले असून त्यांना वैष्णवी आणि महेश्वरी अशा दोन मुली आहेत. नवरा करण जितेंद्र भोसले यांना कोणतेही कामधंदा नसल्याने आणि दारूच्या व्यसनामुळे अश्विनी यांना उपजीविकेसाठी नर्तिकेचे काम करावे लागत होते. अश्विनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नवरा करण याने तिला वारंवार फोनवरून “कला केंद्रात काम करू नको, माझ्यासोबत घरी ये” असे सांगत धमक्या देत होता. “तू आली नाहीस तर खलास करतो” अशीही धमकी दिली होती.

१४ एप्रिल रोजी दुपारी करण याने रेणुका कला केंद्रातील अश्विनी यांच्या खोलीत येऊन तिला गावाकडे घरी जाण्यास सांगितले. अश्विनी यांनी कामधंदा नसल्याने आणि दारू पिण्याच्या सवयीमुळे सोबत जाण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये बराच वेळ भांडण झाले. करण याने मोठमोठ्याने ओरडा, शिवीगाळ आणि हाताने मारहाण सुरू केली. अश्विनी यांनी प्रतिकार करत त्याला भिंतीवर ढकलले. त्यानंतर करण याने अश्विनी यांना खोलीत ओढले आणि “तुला जिवेच मारतो” असे म्हणत कमरेला असलेला चाकूसारखा लोखंडी भाला उपसून वार केले. 

या वेळी अश्विनी यांनी मोठ्याने “वाचवा, वाचवा” अशी आरोळी दिली. कला केंद्रातील सपना देवगण शिंदे, यासीन हसन शेख, कृष्णा गोविंद वाघमारे यांनी धावत आले आणि मारहाण करणाऱ्या करण याला रोखले. सपना शिंदे यांनी अश्विनी यांना रिक्षाने तातडीने जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रेणुका कला केंद्राचे चालक मंगल दिपक देशमुख व सुरज नवनाथ नाईकवाडी यांना घटनेची माहिती देण्यात आली.

अश्विनी यांनी पूर्ण शुद्धीवर असताना १४ एप्रिल रोजी रात्री फिर्याद दिली आहे. त्यात करण जितेंद्र भोसले यांच्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा आरोप आहे. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल