**बार्शी : शेंद्री फाट्याजवळ पोलिसांनी दोन तरुणांकडून पिस्तुल, तलवार व तीन कोयते जप्त**

**बार्शी : शेंद्री फाट्याजवळ पोलिसांनी दोन तरुणांकडून पिस्तुल, तलवार व तीन कोयते जप्त** 
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या खांडवी बीट अंमलदार मदतनीस पोकॉ/१२१९ नागनाथ वैजिनाथ आंधळे यांच्या नेतृत्वाखालील रात्रगस्त पथकाने आज १७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ०३.१५ वाजता हॉटेल स्वामिनीसमोर (बार्शी-कुडूवाडी रोड, मौजे शेंद्री शिवार) एका बिननंबरच्या मोटरसायकलवरून फिरत असलेल्या दोन तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तुल, एक तलवार व तीन कोयते असा बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, १६ एप्रिल रात्री ११ वाजता सुरू झालेल्या कोंबींग ऑपरेशन व रात्रगस्तीदरम्यान शेंद्री फाटा ते बार्शी दरम्यान गस्त घालत असताना संशयास्पद मोटरसायकल दिसली. पथकाने पाठलाग करत हॉटेल स्वामिनीसमोर ती थांबवली. चौकशीत दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांची झडती घेण्यात आली. पंचांसमक्ष झालेल्या झडतीत त्यांच्याकडून खालील वस्तू हस्तगत झाल्या :
एक लोखंडी बॉडीचे पिस्तुल (बॅरलवर नक्षी, काळी ग्रीप, मॅगजिनसह, लांबी १७ सेमी, उंची १२ सेमी) किंमत २०,००० रुपये.
एक लोखंडी तलवार (लांबी ८६ सेमी, मुठ १२ सेमी, पात्याची रुंदी ३.५ सेमी)
एक लोखंडी कोयता (लाकडी मुठ, लांबी ७० सेमी, मुठ १२.५ सेमी, रुंदी ४ सेमी)
दुसरा लोखंडी कोयता (लोखंडी मुठ, लांबी ५९ सेमी, मुठ १९ सेमी, रुंदी ३ सेमी)
तिसरा लोखंडी कोयता (काळी प्लास्टिक मुठ, लांबी ४३ सेमी, मुठ २१ सेमी, रुंदी १० सेमी)
हिरो स्प्लेंडर कंपनीची काळी मोटरसायकल (चेसी नं. MBLHAW112N9J36692, बिननंबर) किंमत २५,००० रुपये.
एकूण जप्त मालमत्तेची किंमत ४५,००० रुपये आहे. दोघांनी अग्निशस्त्र परवाना नसल्याचे कबूल केले.
अटक करण्यात आलेले दोन आरोपी :
१) ऋषीकेश रामेश्वर टिंगरे (२२ वर्षे), रा. शेंद्री, ता. बार्शी, जि. सोलापूर
२) तुषार रणजित शिंदे (१७ वर्षे), रा. वांगरवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, पोसई वळसने, पोहेकॉ/१६१४ गाटे, पोहेकॉ/१७४७ केकाण, पोना/५९२ चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३, ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सविस्तर पंचनामा करून सर्व शस्त्रे व मोटरसायकल जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल