**बार्शी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डिजे-डॉल्बी लावल्याने दोन उत्सव मंडळांवर गुन्हे दाखल**
**बार्शी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डिजे-डॉल्बी लावल्याने दोन उत्सव मंडळांवर गुन्हे दाखल**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) : जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘नो डिजे, नो डॉल्बी, नो लेझर लाइट’ आदेशाचे उल्लंघन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत उच्च आवाजातील डिजे आणि डॉल्बी सिस्टम वापरल्याने भीम गर्जना मित्र मंडळ व विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ, बार्शी यांच्यावर ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोलापूर जिल्हा प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्व जयंती उत्सव मंडळांची बैठक घेऊन पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करण्याच्या सूचना आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘नो डिजे-नो डॉल्बी’ आदेशाची नोटीस सर्व मंडळांना देण्यात आली होती. तरीही १४ एप्रिल २०२६ रोजी बार्शी शहरात निघालेल्या मिरवणुकीत दोन्ही मंडळांकडून डिजे-डॉल्बी लावण्यात आले.
नॉइज लेव्हल मशीनने केलेल्या मोजणीत या वाद्यांचा आवाज निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त डेसिबलमध्ये आढळला. यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३(३)(५) अंतर्गत दोन्ही मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
**भीम गर्जना मित्र मंडळ प्रकरणात आरोपी :**
- अध्यक्ष सुरज दगडू भालशंकर
- गणेश भगवान चव्हाण
- आकाश लंकेश्वर (पूर्ण नाव माहित नाही)
- साहिल शेख (पूर्ण नाव माहित नाही)
- राज चलवदे (पूर्ण नाव माहित नाही)
सर्व राहणार : सोलापूर रोड, बार्शी.
याशिवाय डिजे-डॉल्बी मालक (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही), ऑपरेटर कुणाल राजकुमार खुने (रा. खेड शिवापूर, जि. पुणे), क्रेन चालक (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्याही विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
**विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ प्रकरणात आरोपी :**
- अध्यक्ष धीरज राम बोकेफोडे (रा. चोरमुळे प्लॉट, बार्शी)
- उपाध्यक्ष बाबा शेंडगे
- खजिनदार प्रफुल्ल बसवंत
- सचिव अक्षय दीपक बोकेफोडे
- सहसचिव सत्यपाल बबन बोकेफोडे (सर्व राहणार भिमनगर, बार्शी)
याशिवाय पांढऱ्या रंगाचा आयशर टेम्पो (एमएच ४२ बीआर ८७४८) मालक संदीप रामदास निंबाळकर (वय २५, रा. पोकळज, ता. करमाळा), शिवमुद्रा बॅन्जो ग्रुप ऑपरेटर (पूर्ण नाव माहित नाही), लाल रंगाचा ट्रॅक्टर (एमएच १३ सीएस ६७७०) चालक उल्हास बाळासाहेब भालके (रा. गाडेगाव, ता. बार्शी), कृष्णा बळीराम वाघचौरे (रा. देवाची आळंदी, ता. खेड, जि. पुणे), सोन्या पाटील (एस.पी. डॉल्बी-डिजे ऑपरेटर), महेश मांजरे (रा. देवाची आळंदी, जि. पुणे, डिजे-डॉल्बी मालक) आणि शिंदे जनरेटर्स मालक (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्याविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व मिरवणुकांसाठी ‘नो डिजे, नो डॉल्बी, नो लेझर लाइट’ असे स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने वारंवार बजावले होते. तरीही काही मंडळांनी नियम मोडल्याने ही कारवाई झाली आहे.
प्रशासनाने सर्व उत्सव मंडळांना पारंपरिक वाद्यांसह शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या