**बार्शी : शेतीत अकस्मात आग, आंबा-पेरू-लिंबू झाडांसह ड्रिप पाईप्स जळून दोन लाखांचे नुकसान**

**बार्शी : शेतीत अकस्मात आग, आंबा-पेरू-लिंबू झाडांसह ड्रिप पाईप्स जळून दोन लाखांचे नुकसान** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी बार्शी :  बार्शी तालुक्यातील तुळजापूर रोडवरील कदम वस्ती जवळील शेतीत अज्ञात कारणाने भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यात आंबा, पेरू आणि लिंबूची झाडे जळून खाक झाली असून, पाणी देण्याचे पाईप्स व ड्रिपचे पाईप्सही पूर्णपणे जळाले आहेत. या अपघाती जळीतामुळे शेतमालकिनीचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

ही घटना ९ एप्रिल २०२६  रोजी रात्री ७ वाजता ते  १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान घडली. बार्शी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अकस्मात जळीत नोंदणी क्रमांक ०१/२०२६ नुसार ही बाब समोर आली आहे.

शेतमालक कुसुम अशोक शिंदे (वय ६२ वर्षे, राहणार पाटील प्लॉट, बार्शी, ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, “माझ्या गट नंबर १४८७/२ मधील शेतातील झाडांना अज्ञात कारणाने आग लागली. त्यात झाडांसह पाण्याचे पाईप्स आणि ड्रिप पाईप्स जळून गेले. एकूण दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक शेतकऱ्यांमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांनी आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**