**बार्शी: जमीन वादातून कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिस हस्तक्षेपाने अनर्थ टळला**

**बार्शी: जमीन वादातून कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिस हस्तक्षेपाने अनर्थ टळला**

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : बार्शी तालुक्यातील रातंजन येथील एका कुटुंबीयांनी जमिनीच्या वादातून पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी (२४ एप्रिल) दुपारी सुमारे १२.५० वाजता घडली.

संतोष साठे यांचा जागेच्या वादावरून प्रशासकीय स्तरावर दीर्घकाळ पाठपुरावा सुरू होता. तोडगा न निघाल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना आत्मदहनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत बार्शी शहर पोलिसांनी पंचायत समिती परिसरात आधीच बंदोबस्त तैनात केला होता.

दरम्यान, संतोष साठे, त्यांची पत्नी जगदेवी साठे आणि सखाराम साठे हे तिघे पेट्रोलची बाटली घेऊन पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. त्यांनी अंगावर पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत तिघांना ताब्यात घेतले. यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला गेला.

या प्रकरणी तिघांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी जीव धोक्यात घातल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

जमिनीच्या वादातून प्रशासनाकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्याला उत्तर न मिळाल्याने कुटुंबीयांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली.

KDM NEWS 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल