**बार्शी : बार्शी तालुका होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशनने जागतिक होमिओपॅथी दिन उत्साहाने साजरा केला**
**बार्शी : बार्शी तालुका होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशनने जागतिक होमिओपॅथी दिन उत्साहाने साजरा केला**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी ** होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हनिमन यांच्या २७१ व्या जयंतीनिमित्त १० एप्रिल रोजी जगभरात जागतिक होमिओपॅथी दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने बार्शी तालुक्यातील होमिओपॅथी चिकित्सकांनी डॉ. हनिमन यांना पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी तालुका होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल ताटे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशुतोष लोहिया यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी होमिओपॅथी उपचार पद्धतीच्या फायद्यांबाबत, जनजागृती आणि तालुक्यातील होमिओपॅथी सेवेच्या विस्तारावर मार्गदर्शन केले.
तालुक्यातील सर्व होमिओपॅथी डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये **डॉ. कालिदास लिमकर,डॉ. क्षमा बकाल,डॉ. देविदास इंगळे,डॉ. प्रज्ञा हजगुडे,डॉ. वसुदेव सावंत,डॉ. वाकडे,डॉ. सुहास राऊत, यांच्यासह अनेक चिकित्सक सहभागी झाले होते.
कार्यक्रमात होमिओपॅथी ही सुरक्षित, स्वस्त आणि मुळापासून उपचार करणारी पद्धती असल्याचे सांगण्यात आले. तसेच भविष्यात तालुक्यात होमिओपॅथी जागृतीसाठी अधिक कार्यक्रम घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
हा कार्यक्रम बार्शी तालुका होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या