**बार्शीत धक्कादायक प्रकरण : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार शारीरिक अत्याचार; जबरदस्तीने गर्भपात घडवला**
**बार्शीत धक्कादायक प्रकरण : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार शारीरिक अत्याचार; जबरदस्तीने गर्भपात घडवला**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :** शहरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून विश्वासात घेतले आणि नंतर तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. आरोपीने तिला दोन महिन्यांची गर्भवती असताना पुण्यात नेले आणि स्वतःच्या घरात जबरदस्तीने गर्भपाताची औषधे देऊन गर्भपात केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी सोहेल बाबू शेख (रा. बालाजी सिम्फोनी, पनवेल, नवी मुंबई) याने मे-जून २०२४ पासून २ मार्च २०२६ पर्यंत तिला लग्नाचे आश्वासन देऊन फसवले. त्यानंतर बार्शी येथील एका लॉजमध्ये तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जेव्हा तिला गर्भधारणा झाल्याचे समजले, तेव्हा आरोपीने तिला पुणे येथे नेले आणि आपल्या राहत्या ठिकाणी एम.टी.पी. संदर्भातील औषधे जबरदस्तीने दिली.
या घटनेसंदर्भात पीडितेच्या तक्रारीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कलम ६९, ८९, ६४(२)(ड), ३५१(२)(३) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या