**बार्शी येथील सॅन्ट्रो ऑर्केस्ट्रा बारमध्ये पोलीस छापा; १८ नर्तिकांसह ९ ग्राहक ताब्यात, १० नकली नोटांचे बंडल, तलवार, दारू आणि १३ वाहने जप्त**

**बार्शी येथील सॅन्ट्रो ऑर्केस्ट्रा बारमध्ये पोलीस छापा; १८ नर्तिकांसह ९ ग्राहक ताब्यात, १० नकली नोटांचे बंडल, तलवार, दारू आणि १३ वाहने जप्त** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर ), १७ एप्रिल २०२६:** बार्शी-मालवंडी रोडवरील मौजे बळेवाडी येथील सॅन्ट्रो ऑर्केस्ट्रा बारमध्ये रात्री १२.३० वाजता सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दंगा नियंत्रण पथकाने छापा टाकला. अंगावर तोकडे कपडे घालून १८ महिला अश्लील नृत्य करत असल्याचे आढळून आले. बार मालक, मॅनेजर आणि ९ ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले. ठिकाणावरून १० नकली नोटांचे बंडल, लोखंडी तलवार, देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, १३ वाहने, ४२ हजार रुपयांची रोख रक्कम, साऊंड सिस्टम, अम्प्लिफायर आणि २६ मोबाइल फोन जप्त करण्यात आले.

पोलीस अंमलदार रहिम अलादीन मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ एप्रिल रोजी रात्री मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. दंगा नियंत्रण पथकातील पोकॉ/६७७ सचिन सपाटे, पोकॉ/४५८ बुद्धभूषण खरात, पोको ४७८ आकाश पाचकुडवे, मपोकॉ/१५१९ निशा उइके आणि चालक पोकॉ/डी.६३ पवार यांच्यासह पथक बारमध्ये दाखल झाले. आत गेल्यावर डीजे अम्प्लिफायरचा मोठा आवाज आणि स्टेजवर १८ महिला बिभत्स हावभाव करून नाचत असल्याचे दिसले. हॉलमध्ये नोटांसारखे कुपन उधळलेले आणि ग्राहक सोफ्यावर बसून अश्लील हावभाव करत असल्याचे पाहण्यात आले.
बारचा मालक युवराज अर्जुन बारंगुळे (खांडवी, बार्शी) आणि समाधान प्रल्हाद पाटील (बळेवाडी) तर मॅनेजर अमोल प्रल्हाद पाटील (बळेवाडी) असे आढळले. ग्राहक म्हणून पुथ्वीराज अशोक पाटील (३२), गायकवाड (४२), पाटील (३५),  वाघ (२८), पवार (४०), बालाजी  (५१),  जाधव (२३), मोरे (३८) आणि मलिक (३३) यांना ताब्यात घेण्यात आले.

काउंटरवर नाचण्यासाठी आणि उधळण्यासाठी १० नकली नोटांचे बंडल, एक लोखंडी तलवार (एकूण लांबी ३०.५ इंच) आणि विविध दारूच्या बाटल्या मिळाल्या. जप्त वाहनांमध्ये ८ दुचाकी (डेस्टिनी, शाइन, बुलेट, पॅशन, पल्सर, अॅक्टिव्हा, ग्राझा) आणि ४ चारचाकी (क्रेटा, बोलेरो, फॉर्च्युनर) यांचा समावेश आहे. एकूण जप्त मालमत्तेची किंमत ५७,५१,२५५ रुपये आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृह आणि मद्यपान कक्ष (नृत्य आणि अश्लील नृत्य प्रतिबंध) अधिनियम २०१६ चे कलम ३, ८(१)(२)(४), भारतीय न्याय संहिता कलम २९६(३)(५), शस्त्र अधिनियम कलम ४, २५ आणि मुंबई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना तपासासाठी नोटीस देण्यात आली असून पुढील तपास बार्शी तालुका पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल