**बार्शी : डॉ. संजय अंधारे यांच्या सुश्रुत हॉस्पिटलचा नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची नोटीस**

**बार्शी : डॉ. संजय अंधारे यांच्या सुश्रुत हॉस्पिटलचा नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची नोटीस** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**सोलापूर : बार्शी येथील गट क्र. ८३९, अलीपुर रोडवरील सुश्रुत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर यांनी डॉ. संजय श्रीधर अंधारे यांना यासंदर्भात नोटीस बजावली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांच्या स्वाक्षरीने १८ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, श्री. संदीप चतुर्भुज सुतार यांनी १० फेब्रुवारी २०२६ रोजी केलेल्या तक्रारीनुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथील वैद्यकीय अधीक्षकांनीही या प्रकरणी अहवाल सादर केला आहे.

**मुख्य उल्लंघने :**

- बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट १९४९ कलम ५ अंतर्गत अग्निशमन विभागाचे ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ (NOC) सादर न केल्याचे आरोप आहेत.
- जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीचे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र सादर न केल्याचेही निदर्शनास आले आहे.
- मुंबई उच्च न्यायालयातील रिट याचिका (स्टॅम्प क्र. २०४८४/२०२४) याबाबतची सद्यस्थिती स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने डॉ. अंधारे यांना सात दिवसांच्या आत पुराव्यासह खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास हॉस्पिटलचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय बार्शी यांना नोटीस पोहोचवून खुलासा मिळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ यांना देखील याची माहिती देण्यात आली आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल