**कलंब येथील महिला भूमापक २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात**
**कलंब येथील महिला भूमापक २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात**
**KDM NEWS प्रतिनिधी यवतमाळ :** भूमीअभिलेख विभागातील परिरक्षण भूमापक म्हणून कार्यरत असलेल्या शितल पांडे (वय ३७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या यवतमाळ पथकाने मंगळवारी (१९ मे २०२६) २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
कोठा (वेणी) शिवारातील एका मृत व्यक्तीच्या प्लॉटवरील मालमत्ता हक्काची नोंदणी करून घेण्यासाठी आलेल्या तक्रारदाराकडून वारसांची नावे फेरफार करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. तक्रारदाराने भूमीअभिलेख कार्यालय, कलंब येथे शितल पांडे यांची भेट घेतली असता, त्यांनी फेरफारासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाने १८ आणि १९ मे रोजी सापळा रचला. सापळा कारवाईदरम्यान शितल पांडे यांनी तक्रारदाराकडून २५ हजार रुपये स्वीकारले. त्यांच्या चेंबरमध्ये पंचांसमक्ष ही रक्कम घेताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली.
शितल पांडे यांच्यावर कलंब पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बापु बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर, निरीक्षक मनोज ओरके, अर्जुन घनवट व त्यांच्या पथकाने पार पाडली.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या