**बार्शी-सोलापूर रस्त्यावर भीषण दुचाकी अपघात : एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी**

**बार्शी-सोलापूर रस्त्यावर भीषण दुचाकी अपघात : एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी** 

**KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** बार्शी-सोलापूर महामार्गावर शहरालगत घोरओढ्या येथील रेल्वे पुलाजवळ शनिवार, २३ मे रोजी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात बार्शीतील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले.

मृत व्यक्तीचे नाव **युवराज विजय पवार** (वय २१, रा. सोलापूर रोड, बार्शी) असे आहे. जखमींमध्ये **विवेक विश्वनाथ सातपुते** (२१), **सुदर्शन सुहास दळवी** (२१) आणि **सम्राट अरविंद पाटील** (२२, सर्व रा. सासुरे, ता. बार्शी) यांचा समावेश आहे. जखमींना बार्शीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

**अपघाताची कारणमीमांसा:**  
सासुरे गावातील तीन तरुण आपल्या एका मित्राला अचानक चक्कर येत असल्याने उपचारासाठी बार्शीकडे दुचाकीवर घेऊन येत होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी रेल्वे पुलाजवळ समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, एका दुचाकीवरील तिघे जण थेट पुलाखाली २५ ते ३० फूट खोल खड्ड्यात कोसळले. धडकेत दुचाकीची चाके गाडीपासून वेगळी झाली होती. जखमींना हात-पायांना गंभीर दुखापती आणि फ्रॅक्चर झाले आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत केली आणि जखमींना रुग्णालयात हलविले. रात्री उशिरापर्यंत बार्शी शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी दोन्ही दुचाकी जप्त केल्या असून, अधिक तपास सुरू आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल