**बार्शी : अवैध वेळेनंतर चालवल्या जाणाऱ्या लवंगी मिरची कला केंद्रावर पोलीसांची धाड; ५० लाखांवर मुद्देमाल जप्त, ७२ जणांवर गुन्हा**

**बार्शी : अवैध वेळेनंतर चालवल्या जाणाऱ्या लवंगी मिरची कला केंद्रावर पोलीसांची धाड; ५० लाखांवर मुद्देमाल जप्त, ७२ जणांवर गुन्हा** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :** बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने रात्री १.३० वाजता बार्शी-लातूर रोडवरील लवंगी मिरची कला केंद्रावर छापा टाकला. शासनाने निर्धारित केलेल्या वेळेनंतरही केंद्र चालवून कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ७२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार अवैध व्यवसायांवर धडक कारवाई सुरू असताना ही मोहीम राबवण्यात आली. पथकाने धाड टाकली असता केंद्र सुरू असल्याचे आढळून आले. यामध्ये नृत्य करणाऱ्या नृत्यांगना, ग्राहक, चालक आणि मालक यांचा समावेश आहे.

**जप्त मुद्देमाल :**  
पोलिसांनी केंद्रातून **५०,१३,४६० रुपये** किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये रोख रक्कम, मोबाइल फोन, विविध साहित्य, चारचाकी व दुचाकी वाहने आणि देशी दारूच्या बाटल्या यांचा समावेश आहे.

या प्रकरणी **भारतीय न्याय संहिता**, **महाराष्ट्र पोलीस अधिनियम** आणि **महाराष्ट्र दारूबंदी कायदा** यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास बार्शी तालुका पोलीस ठाणे करत आहे.

**कारवाईत सहभागी अधिकारी :**  
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने (प्रभारी), पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, दत्तात्रय भालेराव, चंद्रकांत घोळवे, पोहेकॉ धनराज केकाण, डुकळे, स्वाती काटे, राहुल बोंदर, बिरकले, कांबळे, चौधरी व चालक खराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल