**धाराशिव : चालत्या ट्रकमधून मेंढ्या-शेळ्या चोरणाऱ्या टोळीचा डाव फसला; पोलिसांनी २४ तासांत सहा आरोपींना अटक**

**धाराशिव : चालत्या ट्रकमधून मेंढ्या-शेळ्या चोरणाऱ्या टोळीचा डाव फसला; पोलिसांनी २४ तासांत सहा आरोपींना अटक** 

**KDM NEWS प्रतिनिधी धाराशिव : सोलापूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकवर चढून शेळ्या-मेंढ्या चोरण्याची हॉलिवूडपटासारखी घटना घडली. एका कारचालकाने हा संपूर्ण प्रकार मोबाइलमध्ये कैद केला आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने धाराशिव पोलिसांना मोठी यश मिळाले. स्थानिक गुन्हे शाखा आणि येरमाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत टोळीचा भेदाफोड करत सहा आरोपींना जेरबंद केले. यावेळी चोरीला गेलेल्या मेंढ्या-शेळ्यांसह सुमारे २.७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

**घटना कशी घडली?**  
महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रकच्या मागे आरोपी चढला. त्याने एक एक करून शेळ्या-मेंढ्या खाली फेकल्या. खाली दुचाकीवर थांबलेल्या साथीदारांनी त्या पकडल्या. शेळ्या ओरडू नयेत म्हणून त्यांच्या तोंडात काटे टोचण्याची क्रूर पद्धतही वापरण्यात आली. हा धाडसी प्रकार दिवसाढवळ्या घडला. दुसऱ्या दिवशी देखील अशाच पद्धतीने चोरी करण्याचा प्रयत्न झाला.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर धाराशिव पोलिसांनी तातडीने हालचाल सुरू केली. सीसीटीव्ही फुटेज, व्हायरल व्हिडीओ आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. येरमाळा परिसरातून सहा जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, ही टोळी महामार्गावर वारंवार अशा चोर्‍या करत होती.

**पोलिस कारवाई**  
धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून चोरीचे मुद्देमाल आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले. पुढील तपास सुरू असून, या टोळीचे इतर सदस्य आणि जुने गुन्हे यांचाही शोध घेतला जात आहे.

ही घटना महामार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. पोलिसांनी ट्रक चालक आणि वाहतूकदारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल