**बार्शी तालुका पोलीस ठाण्यात बकरी ईद व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती बैठक**

**बार्शी तालुका पोलीस ठाण्यात बकरी ईद व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती बैठक** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर):** आगामी बकरी ईद सण आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. 

ही बैठक आज दि. २४ मे २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.४० वाजेदरम्यान पार पडली. 

बैठकीला पत्रकार, पोलीस पाटील, मोहल्ला कमिटी सदस्य, मुस्लिम बांधव, कुरेशी (खाटीक) समाजाचे प्रतिनिधी, शांतता समिती सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

**ग्राम सुरक्षा दलाला साहित्य वाटप**  
बैठकीत ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना गाव परिसरातील सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी लाठी, शिट्टी आणि टॉर्चचे वाटप करण्यात आले. रात्रगस्त, जनजागृती आणि संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी या साहित्याचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

**मुख्य सूचना**  
- बकरी ईद सण शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि कायद्याचे पूर्ण पालन करून साजरा करावा.  
- गोवंश हत्या करू नये.  
- मांस विक्री उघड्यावर करू नये.  
- सार्वजनिक ठिकाणी मांसाचे तुकडे किंवा कचरा पडणार नाही याची दक्षता घ्यावी.  
- परिसर स्वच्छ ठेवावा.  

बैठकीत सर्व समाजबांधवांना पोलीस प्रशासनास पूर्ण सहकार्य करण्याचे, सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचे आणि अफवा, आक्षेपार्ह पोस्ट किंवा चुकीच्या संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

**उपस्थित अधिकारी**  
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, PSI भालेराव, एएसआय गवळी, पोलीस हवालदार शेलार, मंगरुळे तसेच इतर पोलीस अंमलदार उपस्थित होते. 

ही बैठक तालुक्यातील शांतता अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल