**बार्शी : अवैध दारू विक्रीवर निर्भया पथकाची धडक कारवाई; १५ हजारांहून अधिकचा मद्यसाठा जप्त**

**बार्शी : अवैध दारू विक्रीवर निर्भया पथकाची धडक कारवाई; १५ हजारांहून अधिकचा मद्यसाठा जप्त** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर)** : बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या आदेशानुसार निर्भया पथकाने गुरुवारी दुपारी मानेगाव येथे छापा टाकून अवैध मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत १५ हजार १४५ रुपयांचा विविध देशी-विदेशी मद्य आणि बिअरचा साठा ताब्यात घेण्यात आला.

कारवाईत आरोपी रोहित दादासाहेब ताटे (वय २६, रा. मानेगाव, ता. बार्शी) याला पकडण्यात आले. तो बार्शी-वैराग रोडलगत मौजे मानेगाव येथील हॉटेल शिवारच्या मागील बाजूला विनापरवाना मद्य विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावर निर्भया पथकाने २१ मे २०२६ रोजी दुपारी २.२० वाजता धडक दिली.

जप्त करण्यात आलेल्या मद्यामध्ये ओल्ड मंक, ग्रँड मास्टर, रॉयल स्टॅग, मास्टर डिलाइट, रॉयल चॅलेंज, मॅकडॉवेल नं. १, मुंबई माल्ट, इम्पिरियल ब्ल्यू, टँगो पंच यासह टुबर्ग, कार्ल्सबर्ग आणि किंगफिशर बिअरच्या बाटल्या समाविष्ट आहेत.

या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार हनुमंत लिंबाजी पाडुळे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुंडे करत आहेत.

या यशस्वी कारवाईत निर्भया पथकातील पोहेकॉ बाबासाहेब घाडगे, पोकॉ हनुमंत पाडुळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल नम्रता गटकूळ आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब महानोर यांनी भाग घेतला.

सदर कारवाईत अवैध दारू विक्री करणाऱ्यांना कठोर इशारा मिळाला असून, बार्शी उपविभागात अशा कारवाया सुरू राहतील, असे उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांनी सांगितले.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल