**बार्शीत ७.५० लाखांचे बोगस उडीद बियाणे जप्त; विक्रेत्यावर गुन्हा दाखल**
**बार्शीत ७.५० लाखांचे बोगस उडीद बियाणे जप्त; विक्रेत्यावर गुन्हा दाखल**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :** तालुका कृषी विभागाने २६ मे २०२६ रोजी दुपारी मोठी कारवाई करत ७ लाख ५२ हजार ६४० रुपयांचे बोगस उडीद बियाणे जप्त केले. यामुळे हजारो शेतकऱ्यांना फसवणुकीपासून वाचवले गेले.
स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, शेळगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) येथील मालक रत्नाकर रघुनाथ कोले यांनी निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीच्या NUL-7 (विश्वास) या उडीद वाणाची हुबेहूब नक्कल करून बार्शीतील स्वराज कॉलनी येथील गोडाऊनमध्ये साठवले होते. यातील २१६ बॅग (प्रति ५ किलो) गोडाऊनमध्ये आणि १६८ बॅग विक्री केलेल्या असे एकूण ३८४ बॅग जप्त करण्यात आले.
या कारवाईत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर शुक्रचार्य भोसले व कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरीय भरारी पथकाने काम केले. तालुका कृषी अधिकारी बार्शी संतोष कोयले, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अतुल जाधव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी बाळू बागल, गुण नियंत्रण अधिकारी किशोर अंधारे, सहाय्यक कृषी अधिकारी गणेश पाटील, निर्मल कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ भीमशेट्टी आणि बार्शी शहर पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी सचिन देशमुख यांनी सहभाग घेतला.
रात्री उशिरा बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये बोगस बियाणे विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या