**"बार्शी तालुक्यात सलग दुसऱ्या धडक कारवाई! प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त"**
"बार्शी तालुक्यात पुन्हा मोठी धडक कारवाई! प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त"
**KDM NEWS प्रतिनिधी वैराग**सोलापूर:** वैराग पोलिसांच्या पेट्रोलिंग दरम्यान मौजे भार्तभरे येथे मोठा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. शेख हसिफ अल्लाउद्दीन (रा. आंबेहोळ, ता.जि. धारशिव) याच्या ताब्यातून हिरो स्प्लेंडर दुचाकीवरून (क्रमांक MH-२५ AU-७३६६) विविध प्रकारचे प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचे पाकिटे आढळून आले.
दिनांक २१ मे २०२६ रोजी सकाळी ९.२५ वाजता वैराग पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुंदन गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १.१८ लाख रुपये इतकी आहे. यात डायरेक्टर स्पेशल पानमसाला, केआर-१००० गुटखा, Zn-०१ जाफरानी जर्दा, विनालेबल व एक्स्ट्रा फ्रेशनेश सुगंधित तंबाखू, शॉट लक्झरी चूइंग तंबाखू, बादशाह गुटखा, विमल पानमसाला आदी विविध ब्रँड्सचा समावेश आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी रामानंद उमाशंकर स्वामी यांनी मुद्देमालाची पाहणी केली असता तो महाराष्ट्र शासनाच्या १६ जुलै २०२५ च्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधित असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने मुद्देमाल स्वतःचा असल्याचे कबूल केले, परंतु खरेदी बिल किंवा वाहन कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे सांगितले.
या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलम २६(२), २७(३), ३०(२) आदी सह कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, २७४, २७५ आदींखालीही कारवाई करण्यात येत आहे. आरोपीविरुद्ध वैराग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी मुद्देमाल व वाहन पुढील आदेशापर्यंत ताब्यात घेतले आहे. सदर कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रतिबंधित तंबाखू उत्पादनांच्या अवैध वाहतूक व विक्रीवर आळा बसण्यास मदत होईल, असे अन्न सुरक्षा विभागाकडून सांगण्यात आले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या