**सोलापूर : जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते; पैशांची मागणी, सायबर सेलकडे तक्रार**

**सोलापूर : जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते; पैशांची मागणी, सायबर सेलकडे तक्रार** 

**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, दि. २५ मे :** सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्या नावाने आणि छायाचित्राचा वापर करून बनावट सोशल मीडिया खाते तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या खात्यामार्फत काही नागरिकांकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हे बनावट खाते **व्हिएतनाम** आणि **थायलंड** येथून तयार करण्यात आले असून, त्यात “Collector & District Magistrate” असे पदनाम दाखवून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय किंवा त्यांच्याकडून अशा प्रकारे कोणत्याही नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकरणी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी स्वतः सोलापूर सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बनावट खात्यांमधून पाठवलेल्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत आणि संशयास्पद संदेश तात्काळ पोलिस किंवा प्रशासनाला कळवावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सोशल मीडियावरील फसवणुकीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अशा प्रकारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल