**बार्शी नगरपालिका शाळा क्र. २१ ला CBSE संलग्नतेसाठी माजी आमदार राजेंद्र राऊत यांची शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी**
**बार्शी नगरपालिका शाळा क्र. २१ ला CBSE संलग्नतेसाठी माजी आमदार राजेंद्र राऊत यांची शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :** बार्शी येथील ढगे मळा, सिद्धेश्वर नगर येथील नगरपालिका शाळा क्रमांक २१ ला इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत CBSE अभ्यासक्रमानुसार इंग्रजी माध्यमात संलग्न करण्यासाठी माजी आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे औपचारिक मागणी केली आहे.
मा. दादाजी भुसे यांची मंत्रालय मुंबई येथे भेट घेतल्यानंतर मंत्री महोदयांनी प्रस्तावाबाबत सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षण विभागाच्या सचिवांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
राजेंद्र राऊत यांनी २५ मे २०२६ रोजी शिक्षणमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात (जा.क्र./RR/१७१८/२०२६) म्हटले आहे की, बार्शी नगरपरिषदेच्या माध्यमातून एक एकर जागेवर ही अत्याधुनिक शाळा बांधण्यात आली आहे. शाळा स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर चालवली जाणार असून, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे.
मागील प्रस्ताव :
बार्शी नगरपरिषदेने मार्च २०२३ मध्ये शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर शिक्षण संचालक (माध्यमिक) पुणे यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांना प्रस्ताव पाठवला होता.
उद्देश :
आजच्या स्पर्धात्मक युगात बार्शी शहर व तालुक्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार CBSE पॅटर्नचे शिक्षण अतिशय माफक शुल्कात उपलब्ध व्हावे, हा मुख्य हेतू असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
ही शाळा सुरू झाल्यास सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची संधी मिळणार आहे. पालक वर्गात या प्रकल्पाबाबत उत्सुकता आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या