**बार्शीतील लेखक सचिन वायकुळे यांच्या 'तिमिर छेदताना' चरित्रग्रंथाला राजर्षी शाहू महाराज प्रेरणादायी साहित्यकृती पुरस्कार**
**बार्शीतील लेखक सचिन वायकुळे यांच्या 'तिमिर छेदताना' चरित्रग्रंथाला राजर्षी शाहू महाराज प्रेरणादायी साहित्यकृती पुरस्कार**
**KDM NEWS प्रतिनिधी पुणे** - राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंतीनिमित्त बार्शीचे लेखक सचिन विमल मदनराव वायकुळे लिखित 'तिमिर छेदताना' या चरित्रग्रंथाला पुण्यातील राजर्षी शाहू महाराज प्रेरणादायी साहित्यकृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार राजर्षी शाहू मल्टिपर्पज फाउंडेशन, सर्किट बेंच फाउंडेशन आणि शांतिदूत परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त वतीने दिला गेला. पुरस्कार वितरण समारंभ पुण्यातील पत्रकार भवन येथे पार पडला.
या ग्रंथात डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या जीवनचरित्राचा वेध घेण्यात आला आहे. अनाथ असूनही संघर्ष, जिद्द आणि सामाजिक जाणिवेच्या बळावर यशस्वी जीवन घडवणाऱ्या डॉ. लवटे यांच्या प्रेरणादायी प्रवासाचे चित्रण लेखकाने प्रभावीपणे केले आहे. साहित्याच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचार रुजवणारे आणि प्रेरणा देणारे लेखन केल्याबद्दल वायकुळे यांचा सन्मान करण्यात आला. हे त्यांचे सहावे पुस्तक आहे.
कार्यक्रमाला राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पद्मश्री उदय देशपांडे, सर्किट बेंच फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश राठोड, शांतिदूत परिवाराचे प्रमुख आणि निवृत्त आयपीएस अधिकारी विठ्ठल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
बार्शीतील पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक म्हणून ओळखले जाणारे सचिन वायकुळे यांनी दीड वर्षांच्या चिंतनानंतर हे पुस्तक लिहिले असून, त्यातून तरुणांना निराशा न बाळगता आत्मविश्वासाने जीवनाला सामोरे जाण्याचे संदेश मिळतात. हा पुरस्कार त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या