**सोलापूर जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेत ४ लाख १० हजार बालकांना लस**
**सोलापूर जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेत ४ लाख १० हजार बालकांना लस**
**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, दि. २८ जून २०२६** - जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत आज ४,००,२१५ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. ० ते ५ वर्षांखालील अपेक्षित ४,३६,५९८ बालकांपैकी ९१.६६ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी सांगितले की, ग्रामीण भागात अपेक्षित बालकांची संख्या ४,३६,५९८ होती आणि त्यापैकी ४,००,२१५ बालकांना लस देण्यात आली. शहरी भागात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडील ४३,६६७ पैकी ३७,७७१ बालकांना (८६.५० टक्के) तर सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील १,०६,०४३ पैकी ९३,३४४ बालकांना (८८.०२ टक्के) लसीकरण झाले.
मोहिमेसाठी जिल्ह्यात एकूण ६,५१३ लसीकरण बूथ उभारण्यात आले होते. यात ग्रामीण भागात ५,५७०, शहरी भागात ५७० आणि महानगरपालिका भागात ३७३ बूथ समाविष्ट आहेत. लसी देण्यासाठी ७,२२२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व इतर पर्यवेक्षकांनी मोहिमेचे पर्यवेक्षण केले.
बस स्टँड, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा, विटभट्ट्या, साखर कारखाने, यात्रा आणि लग्न समारंभ स्थळी विशेष लसीकरण व्यवस्था करण्यात आली होती. भटक्या व ऊसतोड कामगारांच्या वसाहतींसाठी मोबाईल टीम कार्यरत होत्या.
आरोग्य विभागाने डिजिटल मीडिया,वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे जनजागृती केली. आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांनी गृहभेटीद्वारे मोठ्या प्रमाणात प्रचार केला. यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला, असे डॉ. कोपूरवाड यांनी म्हटले.
उर्वरित बालकांचे लसीकरण ग्रामीण भागात तीन दिवसांच्या गृहभेटी आणि शहरी भागात पाच दिवसांच्या गृहभेटी (आयपीपीआय) द्वारे पूर्ण केले जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आश्वासन दिले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या