**सोलापूर : अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई; रामदेव डेअरीवर छापा, ७ लाखांची भेसळयुक्त बर्फी जप्त**

**सोलापूर : अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई; रामदेव डेअरीवर छापा, ७ लाखांची भेसळयुक्त बर्फी जप्त** 

**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर**दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी येथील रामदेव डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. या ठिकाणी कोणताही वैध अन्न परवाना नसताना भेसळयुक्त बर्फी तयार केली जात होती. अधिकाऱ्यांनी १८०७ किलो वजनाचा ६ लाख ९१ हजार ४४५ रुपयांचा भेसळयुक्त मुद्देमाल जप्त केला. त्यातील ५११ किलो बर्फी जागेवरच नष्ट करण्यात आली.

अन्न सुरक्षा अधिकारी रामानंद स्वामी आणि रेणुका पाटील यांच्या पथकाने महादेव कोरे यांच्या जागेतील या डेअरीवर छापा टाकला. तपासात असे आढळले की, येथे शुद्ध दुध किंवा खव्यापासून बर्फी बनवण्याऐवजी दुधातील स्निग्धांश काढून (फॅट फ्री) स्किम्ड मिल्क पावडर आणि वनस्पती तूप वापरून अजमेरी बर्फी व स्वीट बर्फी बनवली जात होती. अस्वच्छ वातावरणात तयार केलेल्या या मिठाईला खऱ्या बर्फीसारखे स्वरूप देण्यात आले होते, ज्यामुळे ग्राहकांना फसवले जात होते.

**जप्त केलेला मुद्देमाल :**  
- १६३ किलो अजमेरी बर्फी (किंमत २९,३४० रुपये)  
- ३४८ किलो गोड बर्फी (किंमत ६२,६४० रुपये)  
एकूण ५११ किलो बर्फी नष्ट केली. याशिवाय हजारो किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि वनस्पती तूपही जप्त करण्यात आले. चार नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा कायदा कलम २६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, नफ्याच्या लालसेपोटी ही गोरखधंदा चालवला जात होता. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर बर्फीतील भेसळीचे प्रमाण आणि आरोग्यावर होणारे परिणाम स्पष्ट होतील. या कारवाईमुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक टळली आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल