**बार्शी पोलिसांची यशस्वी कामगिरी : हरवलेली ४ वर्षांची मुलगी सुखरूप**
**बार्शी पोलिसांची यशस्वी कामगिरी : हरवलेली ४ वर्षांची मुलगी सुखरूप**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी शहरातील मांगडे चाळ परिसरात राहणारी चार वर्षीय रुद्राक्षा बाबासाहेब मांगडे ही आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेली होती. घरातील कोणालाही काही न सांगता निघालेल्या चिमुकलीचा शोध घेण्यात बार्शी शहर पोलिसांनी अल्पावधीत यश मिळवले.
मुलगी दिसेनाशी झाल्याने तिचे वडील बाबासाहेब दगड्डू मांगडे यांनी तातडीने बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनेची गांभीर्यता ओळखून पोलिसांनी लगेच शोधमोहीम सुरू केली. परिसरातील टिळक चौकात मुलगी सुखरूप आढळली. तिला पोलीस ठाण्यात आणून तिची विचारपूस करण्यात आली. चिमुकलीने खेळणे घेण्यासाठी घरातून बाहेर पडल्याचे सांगितले.
पालकांच्या उपस्थितीत मुलीची सुरक्षितता तपासून तिला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. मुलगी सापडल्याने पालकांनी बार्शी शहर पोलिसांचे आभार मानले.
मा. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना/७५९ संगप्पा मुळे, पो.कॉ./७४७ राहुल बोंदर आणि पो.कॉ./९४८ संतोष जाधवर यांनी ही कामगिरी यशस्वी केली.
पोलिसांच्या तत्परतेमुळे चिमुकलीला कोणताही अनुचित प्रकार न घडता अल्पावधीतच तिच्या कुटुंबीयांकडे सुखरूप पोहोचवण्यात आले.
KDM NEWS
टिप्पण्या